Abdul Sattar Visit Farmers: अतिवृष्टीची मदत, ५० हजारांच्या अनुदानाचे काय झाले ? शेतकऱ्याच्या प्रश्नाने कृषीमंत्री बेजार..

Affected Farmers : गावातील हनुमान मंदिरामध्ये एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Abdul Sattar Visit Farm News
Abdul Sattar Visit Farm News Sarkarnama

Chhatrapati Sambhjainagar : सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, तातडीने मदत दिली जाईल, शेतकऱ्यांनी धीर धरावा, अशा कोरड्या आश्वासनांमुळे शेतकरी संतापला आहे. त्याचा फटका कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना बसला. नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्तार यांना ठाकरे गटाच्या सभापतीने व काही शेतकऱ्यांनी आधीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे काय झाले? प्रोत्साहनपर ५० हजारांचे अनुदान कधी मिळणार असे प्रश्न केले. यावर सत्तारांनी सभेतून काढता पाय घेतला

Abdul Sattar Visit Farm News
Ajit Pawar News : मोठी बातमी! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अजित पवारांना क्लिनचीट? काय आहे प्रकरण?

कन्नड तालुक्यातील जेहूर, चिवळी, आंडगाव, निपाणी, मुंगसापुर आदी परिसरात गारांचा जोरदार तडखा बसला होता. (Kannad) यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नुकतीच या भागाला भेट दिली. (Affected Farmers) या वेळी आयोजित सभेत माजी उपसभापती गीताराम पवार व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देताच कृषिमंत्री सत्तार यांनी काढता पाय घेतला.

जेहूर परिसरामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा, उन्हाळ बाजरी, मका, गहू आदींची लागवड करण्यात आली होती. या पिकातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र अशातच रविवारी सायंकाळी गारपीठीने परिसराला जोरदार तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सर्व पीक डोळ्यादेखत उद्धवस्त झाले. परिसरात शेकडो हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले.

गारांचा वेग इतका होता की, कांद्याची पात पूर्णपणे नष्ट झाली. परिसरातील झाडांची पाने गळाल्याने झाडे पूर्णपणे बोडखी झाली अनेक उन्मळून पडली. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसना झाले तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू आहेत. (Latest Maharashtra News)

या पार्श्वभूमीवर मंगळवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, कृषी अधिकारी भीमराव वैद्य, बिडिओ ढोकणे यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन धावती पाहणी केली. यानंतर गावातील हनुमान मंदिरामध्ये एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Abdul Sattar Visit Farm News
PM Narendra Modi News : पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल ७१ हजार तरुणांना नियुक्तपत्र मिळणार

यावेळी सत्तार हे विविध विषयावर भाष्य करत होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे विविध मुद्दे चर्चेले जात होते. अशातच शिवसेना पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताराम पवार यांनी उभे राहत सत्तारांना प्रश्न केला. ही मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र दिवाळीच्या वेळेसही अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. (Latest Political News)

तसेच चालू बाकीदार शेतकऱ्यांना सरकार प्रोत्साहन पर ५० हजार रुपये देणार होते तेही अध्याप मिळालेली नाहीत, यावर खुलासा करा असे म्हणताच मंत्री सत्तार यांनी कार्यक्रम आटोपता घेत पळ काढला. पवार यांनी आतापर्यंत प्रश्न विचारताच कृषीमंत्री सत्तार यांची भंबेरी उडाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com