Abdul Sattar : शिवसेना भगवी आणि हिंदुत्ववादीच, तुमच्या झेंड्यातील हिरव्याचे काय ?

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहेच, पण त्यासोबतच या पक्षामध्ये अठरापगड जाती-धर्माचे असंख्य कार्यकर्ते काम करतात. शिवसेनेत कधीच जातपात मानत नाहीत. (Abdul Sattar)
Devendra Fadanvis-Abdul Sattar
Devendra Fadanvis-Abdul SattarSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्ष भाजपला शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तुमच्या झेंड्यातील हिरव्याचे काय ? असा सवाल करत टोला लगावला. (Shivsena) राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. (Bjp) तिथीवरून शिवजंयती साजरी करणे असो की मग नुकताच एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी दिलेला प्रस्ताव. (Marathwada) भाजप शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने जनाब बाळासाहेब स्वीकारले आहे ? असे म्हणत शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे, ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, असा आरोप केला आहे. यावर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चांगलाच खल झाला. शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र प्रसार माध्यमांशी बोलतांना शिवसेना भगवी आणि हिंदुत्ववादीच आहे आणि राहणार असे ठणाकावून सांगितले.

सत्तार म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते कासावीस झाले आहे. अंब्याच्या झाडाखाली बसण्याची सवय असलेल्यांना आता बाभळीच्या झाडाखाली बसतांना त्रास होत आहे. त्यामुळे शिवसेना व त्यांच्या हिंदुत्वाला आव्हान देण्याची भाषा ते करू लागले आहेत. शिवसेना कायम भगवी होती आणि भगवीच राहणार आहे. पण भाजपने त्यांच्या झेंड्यात असलेल्या हिरव्याचे काय? सध्या तोच बाहेर येऊन बोलतोय का? असा टोला लगावला.

Devendra Fadanvis-Abdul Sattar
दहशतवाद्यांची वकिली करणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमसोबत कधीच जाणार नाही..

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहेच, पण त्यासोबतच या पक्षामध्ये अठरापगड जाती-धर्माचे असंख्य कार्यकर्ते काम करतात. शिवसेनेत कधीच जातपात मानत नाहीत. पण सत्ता गेली म्हणून हवालदिल झालेल्या विरोधी पक्षाला आता दुसरे काही काम शिल्लक राहिले नाही, म्हणून ते जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील सत्तार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com