Abdul Sattar : सत्तारांवर निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचाही आरोप..

Aurangabad : सिल्लाेड न्यायालयाने चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सिल्लाेड पाेलिसांना दिले होते.
Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Marathwada News : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नोटरी अ‍ॅड. एस. के. ढाकरे यांच्याशी संगणमत करून (Sillod) सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून दोन पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करताना मालमत्ता खरेदीच्या संदर्भाने शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याने दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज सिल्लोड न्यायालयात दाखल झाला होता.

Minister Abdul Sattar News, Aurangabad
Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांचा फोन अन् सत्तार बैठक रद्द करून नागपूरला ...

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डाॅ. अभिषेक सुभाष हरिदास यांनी फाैजदारी अर्ज दाखल केला आहे. (Marathwada) महेश शंकरपेल्ली हे सामाजिक कार्यकर्ते तर डाॅ. अभिषेक हरिदास हे २०१९ मध्ये सिल्लाेड मतदारसंघातून निवडणूक लढवलेले, तसेच माहिती अधिकार कार्यर्ते आहेत. त्यांच्या फाैजदारी अर्जानुसार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सिल्लाेड-साेयगाव विधानसभा सदस्य व मंत्री आहेत.

तर अॅड. ढाकरे हे शासकीय मान्यताप्राप्त नाेटरी आहेत. दाेघांनी संगणमताने २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर करावयाच्या शपथपत्रामध्ये खाेटी व बनावट शपथपत्र सादर करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सत्तार यांनी दाेन्ही निवडणुकीत शेतजमिनीच्या तपशीलात दिलेल्या माहितीत तफावत आढळून येते. प्रतिज्ञापत्रानुसार दहिगाव सर्वे नं. ३१ १३१, ३५, ३९, २९ ही शेतजमीन त्यांनी २ लाख ७६ हजार २५० रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले आहे. तर २०१४ मधील प्रतिज्ञापत्रानुसार हीच जमीन त्यांनी ५ लाख ६ हजार रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले.

तसेच उमेदवाराला त्याचा व त्यांच्यावर अवलंबित असलेल्या व्यक्तीच्या तसेच त्याच्या पत्नीच्या वाणिज्य इमारतीचा तपशील देणे आवश्यक असते. मात्र, सत्तार यांनी दाेन्ही निवडणुकीसाठी दिलेल्या नामनिर्देशनपत्रामध्ये वाणिज्य इमारतीच्या तपशीलात तफावत आढळून येते. सिल्लाेड सर्वे न. ९०-२ या वाणिज्य इमारतीची खरेदी २८ हजार ५०० नमूद केली आहे तर २०१४ मधील प्रतिज्ञापत्रानुसार याच वाणिज्य इमारतीची खरेदी किंमत ४६ हजार नमूद केली आहे. तसेच याच मालमत्तेसंबंधी २०१९ मधील शपथपत्राद्वारे खरेदी किंमत १८ लाख ५५ हजार ५०० नमूद केली.

२०१४ मध्ये १ लाख ७० हजार नमूद केली. अन्य निवासी इमारतीची खरेदी किमतीतही माेठी तफावत आहे. सर्वे ३६४ निवासी इमारतीची खरेदी २०९१९ मध्ये १ लाख ६५ हजार रुपये दाखवली. तर २०१४ मधील प्रतिज्ञापत्रानुसार याच निवासी इमारतीची खरेदी किंमत १६ लाख ५३ हजार रुपये दाखवण्यात आली. शैक्षणिक माहितीही सत्तार यांनी लपवली आहे. याप्रकरणी सत्तार व अॅड. ढाकरे यांना शिक्षित, दंडित करण्यात यावे, गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करण्यात आली. सिल्लाेड न्यायालयाने वरीलप्रमाणे चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सिल्लाेड पाेलिसांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com