Abdul Sattar : संतोष दानवेंचे मत म्हणजे माझ्या घरातलेच, ते मी फोडणारच..

माझे दानवे कुटुंबाशी घरगुती संबंध आहेत, संतोष दानवे यांचे मत म्हणजे माझ्या घरातलेच मत आहे. सगळी सेटिंग झाली आहे, मी त्यांच्या घरी जाऊन चहा पिऊन आलो आहे. ( Shivsena)
Abdul Sattar : संतोष दानवेंचे मत म्हणजे माझ्या घरातलेच, ते मी फोडणारच..
Shivsena Minister Abdul Sattar-Bjp Mla Santosh DanveSarkarnama

औरंगाबाद : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडून पाठवायच्या सात जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होत आहे.(Shivsena) शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे तर भाजपसमोर (Bjp) तिसरा उमेदवार विजयी करण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत, आमदारांना सुरक्षित स्थळी हाॅटेला निगराणीत ठेवण्यात आले आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांना गळ घालण्याचे प्रयत्न देखील युद्ध पातळीवर सुरू आहेत.

यातच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे भाजप आमदार संतोष दानवे यांच्यावरच डाव टाकला आहे. संतोष दानवे (Santosh Danve) हे महाविकास आघाडीलाच मतदान करतील, असा दावा सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला आहे. संतोष दानवे यांचे मत म्हणजे माझ्या घरातलेच आहे, ते मी फोडणारच, असा विश्वास देखी सत्तार यांनी व्यक्त केला.

सत्तार यांच्या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष आपल्या बाजून आहेत, आमची मतांची तजवीज झाली आहे, असा दावा वारंवार भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने १६५ आमदारांच्या उपस्थितीत मुंबईच्या हाॅटेलात पुन्हा एकदा आपली एकी दाखवून दिली आहे.

अशावेळी सत्तार यांनी थेट भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांच्या आमदार मुलालाच आपल्या गळाला लावल्याचा दावा केला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपचे नेते महाविकास आघाडीचे आमदार फुटणार असा दावा करत आहे, पण मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी आपलेच आमदार सांभाळावेत. कारण भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे हेच महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत.

Shivsena Minister Abdul Sattar-Bjp Mla Santosh Danve
Nanvneet Rana : उद्धव ठाकरेंनी सभेत भाषण ठोकण्यापेक्षा औरंगाबादकरांना पाणी द्यावे..

माझे दानवे कुटुंबाशी घरगुती संबंध आहेत, संतोष दानवे यांचे मत म्हणजे माझ्या घरातलेच मत आहे. सगळी सेटिंग झाली आहे, मी त्यांच्या घरी जाऊन चहा पिऊन आलो आहे. त्यामुळे मी संतोष दानवेंचे एक मत फोडणार म्हणजे फोडणारच, असा इशारा देखील सत्तार यांनी भाजपला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in