Abdul Sattar : आढावा राज्याचा, सूचना मात्र मतदारसंघातले प्रस्ताव पाठवण्याच्या..

सिल्लोड येथे कृषी भवन उभारणी तसेच मका संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत काय कार्यवाही करता येईल, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Minister Abdul Sattar)
Minister Abdul Sattar News, Mumbai
Minister Abdul Sattar News, MumbaiSarkarnama

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे राज्याचे मंत्री आहेत, बैठकांमध्ये ते आढावा देखील राज्याचा घेतात. पण त्याचे लक्ष सगळे असते ते आपल्या मतदारसंघाकडे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे, शेतकरी आत्महत्या करतायेत त्यामुळे सिल्लोडमध्ये कृषी भवन आणि मका संशोधन केंद्राचा प्रस्ताव तयार करून पाठवा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. त्यामुळे आधी मतदारसंघ मग राज्य असेच काहीसे धोरण कृषीमंत्र्यांचे दिसते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध कृषि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. (Farmers) नुकसानीचे पंचनामे वेळेवर होतील यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना दिलासा देतील, यादृष्टीने काम करण्याची सूचना त्यांनी केल्या. (Marathwada)

Minister Abdul Sattar News, Mumbai
Latur : रितेश-जेनेलियाच्या कंपनीला एमआयडीसीत भूखंड अन् कोट्यावधींचे कर्जही..

यावेळी कृषी विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर, बी. एस. रासकर, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक भागडे, राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांचे कुलसचिव उपस्थित होते. सत्तार यांनी यावेळी विभागनिहाय माहिती घेतली. मोसमी पाऊस परतीच्या मार्गावर असताना राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. विशेषता काही भागात सोयाबीन, कांदा यासह विविध पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याठिकाणी तात्काळ पंचनामे शासकीय यंत्रणेच्या वतीने करावेत. सर्व पंचनामे वेळेवर करुन राज्यात किती नुकसान झाले, याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच राज्यातील कृषी आयुक्तालयातील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी यांच्या कार्यक्षेत्रातील विविध इमारतींच्या बांधकामाचा आढावाही सत्तार यांनी घेतला.

औरंगाबाद शहरात वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात परभणीच्या मालकीची जमीन आहे. याठिकाणी कृषि विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करता येईल का, त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत.

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि हे तालुके आणि परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिल्लोड येथे कृषी भवन उभारणी तसेच मका संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत काय कार्यवाही करता येईल, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com