Abdul Sattar News : कृषीमंत्र्याच्या जिल्ह्यात सातवी तर मतदारसंघात चौथ्या शेतकऱ्याची आत्महत्या..

Farmers : खचलेल्या बळीराजाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे.
Minister Abdul Sattar News, Maharashtra
Minister Abdul Sattar News, MaharashtraSarkarnama

Marathwada : गारपीट, अवकाळी पाऊस आणि त्यामुळे पिक आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यात आठवडाभरात सात तर त्यांच्या मतदारसंघात चार शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत.

Minister Abdul Sattar News, Maharashtra
Imtiaz Jalil News : दिल्लीला गेल्यावर आंदोलनाचे काय होणार ? इम्तियाज यांना चिंता..

दरम्यान, शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, तर अनेक वर्षापासून होत आहेत, असे म्हणत सत्तारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने संतापाचे वातावरण आहे. (Farmers) गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने गहू, हरभरा, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Marathwada) यामुळे खचलेल्या बळीराजाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका आठवड्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी चार या कृषीमंत्री सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, तातडीने त्यांना मदत केली जाईल, ही नेहमीची सरकारी उत्तरे नेते आणि मंत्र्यांकडून दिली जात आहेत.

शेतकरी आत्महत्या होतच असतात या कृषीमंत्र्यांच्या विधानामुळे तर ते किती संवेदनशील आहेत हे स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील आणखी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली.

घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी (१२ मार्च) रोजी त्याची प्राण ज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे (वय २८ )वर्षे रा.बोदवड ता.सिल्लोड, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com