जालना हादरले : चार कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण

जालना शहरातील व्यापाऱ्याचे मुलाला तातडीने शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Jalna police
Jalna policesarkarnama

जालना : जालना शहरातील (Jalna Police) पोलिसांपुढे आव्हान निर्माण करत चार कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे जालना शहर हादरले आहे. इयत्ता दहावीत असलेला स्वयंम महावीर गादिया असे या मुलाचे नाव असून पोलिस त्याचा आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.

Jalna police
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

मंठा चौफुली परिसरातील पोद्दार शाळा परिक्षा सेंटरवरून वॅगन R क्र.MH 20,CS,4956 कार मधून स्वयंमचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली. जालना शहरातील गोल्डन ज्युबिली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असलेला स्वयंम परीक्षेसाठी आज सकाळी पोद्दार शाळेत गेला होता. चालक अक्षय घाडगे याने त्याला सोडले होते. घाडगे हा त्याला सोडून घरी परत आला. त्यानंतर दुपारी 12.30 सुमारास अक्षय घाडगे याला स्वयंमला आणण्यासाठी गाडी घेऊन पाठवले असता तो परतला नाही.

Jalna police
शिवसेनेत आता खैरेंना विचारतो कोण? भाजप खासदार कराडांचा टोला..

स्वयंमचे वडिल महावीर सुभाषचंद्र गादीया यांनी त्यांच्या मोबाईल नंबरवरुन चालक अक्षय याला फोन केला असता समोरुन अनोळखी व्यक्तीने हिंदी भाषेमध्ये चार करोड रुपये लेके अंबड चौफुली आ जाव. बच्चे को लेके जाव, असे म्हणुन फोन कट केला. स्वयंमचे वडील महावीर व चुलते नारायण रामभाऊ सुरासे असे दोघे अंबड चौफुली येथे गेले असता पुन्हा मोबाईलवर कॉल केला असता अबंड येथे या, असे सांगण्यात आले.

मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच महावीर गादीया यांच्या भावाच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com