पंकजा मुंडेंना मंत्री करा; वैद्यनाथासह गणपतीला साकडे

एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama

बीड : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्य मंत्रीमंडळात घ्यावे, या मागणीसाठी आता देवदेवतांना साकडे घालणे सुरु आहे. बीड ते मोहटादेवी पायी दिंडीनंतर आता सोमवारी परळीतील प्रभू वैद्यनाथाला अभिषेक आणि लिंबागणेश (ता. पाटोदा) येथील गणपतीची आरती करुन साकडे घालण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून पराभवानंतर विधान परिषदेला पंकजा मुंडे यांना टाळण्यात आले. या विरोधात जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयातून नाराजी व संताप व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांना उमेदवारीची अपेक्षा समर्थकांना असताना पुन्हा टाळण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेचे तत्कालिन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांचे वाहन आडविण्याचा प्रयत्न करुन तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात प्रचंड घोषणाबाजीची घटना मागच्याच महिन्यात घडली.

Pankaja Munde
केसरकर तब्बल महिन्याभरानंतर मतदारसंघात परतणार; शिवसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष

आता सत्तांतरानंतर मात्र कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांच्या मंत्रीपदासाठी देवदेवतांना साकडे घालण्याचा मार्ग अवलंबला आहे. रविवारी पाटोदा व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दासखेड सोनेगाव फाटा ते लिंबागणेश येथील भालचंद्र गणेश मंदिर पायी दिंडी काढून अभिषेक घालून साकडे घातले. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनीच भाजपचा वटवृक्ष वाढवून १९९५ मधे काँग्रेसची राजवट संपवली. पकंजा मुंडे यांनीही २०१४ मधे संघर्ष यात्रा काढल्यानेच राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तालुकाध्यक्ष अॅड. सुधीर घुमरे, महेंद्र नागरगोजे, नगरसेवक अॅड. सुशील कोठेकर, ज्ञानेश्वर भोसले, राजपाल शेंडगे, श्रीहरी कौठुळे, रामदास गीते, गणेश कोकाटे, बंडु आडसुळ अंकुशराव मुंढे, नारायण नागरगोजे, राम मुंढे, शाहुराव औटे, प्रविण देवडे उपसरपंच, सुरेश कांबळे, राहुल अडागळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Pankaja Munde
चाकणकर `पाॅलिटिकल मॅच्युरिटी` दाखविणार? : रहाटकरांचा तेव्हाचा राजीनामा चर्चेत

पंकजा मुंडे यांच्या परळीतही त्यांच्या समर्थकांनी प्रभू वैद्यनाथाला अभिषेक घालून पंकजा मुंडेंची मंत्रीमंडळात वर्णी लागावी असे साकडे घातले. यावेळी राजेश देशमुख, वैजनाथ जगतकर, डॉ. शालिनी कराड, सुचिता पोखरकर, राजेंद्र ओझा, महादेव इटके, अश्विन मोगरकर, अरुण पाठक, नितीन समशेट्टे, अजय गित्ते, मोहन जोशी, प्रितेश तोतला, प्रल्हाद सुरवसे, योगेश पांडकर, विकास हालगे, श्रीनिवास राऊत, गणेश होळंबे, बंडू चौंडे, गोविंद मोहेंकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in