Marathwada Teacher Constituency : वंचितची निवडणुक रिंगणात उडी ; कालिदास माने यांना उमेदवारी..

Aurangabad : उद्या १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होणार आहे.
Vanchit Bahujan Aghadi News, Aurangabad
Vanchit Bahujan Aghadi News, AurangabadSarkarnama

Vanchit Aghadi : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काल उशीरा (Marathwada) मराठवाडा शिक्षक मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला. लातूरच्या कालिदास माने पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Vanchit Bahujan Aghadi News, Aurangabad
Prithviraj Chavan News : बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरचे कर्ज ४५ टक्क्यांनी वाढणार..

त्यामुळे आता महाविकास आघाडी, भाजप, प्रहार, वंचित आघाडी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. राज्यात वंचित-शिवसेना युती होण्याची चर्चा सुरू असतांनाच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत (Vanchit Bahujan Aghadi) वंचितने उडी घेतली. (Bjp) भाजपचे किरण पाटील यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आपली उमेदवारी दाखल केली.

त्यांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी भाजपचे मराठवाड्यातील खासदार, आमदार, केंद्र आणि राज्यातील मंत्री हजर होते. भाजप, राष्ट्रवादी, प्रहार आणि वंचित आघाडी या प्रमुख पक्षांसह अपक्ष अशा एकून १५ जणांनी ३० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी दिली.

आजपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखले केले आहेत. आज १२ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in