Shivsena : शिरसाट-भुमरेंची रथातून मिरवणूक अन् जंगी सत्कारही..

Sanjay Shirsat : यातून त्यांनी विरोधकांना एक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
Sanjay Shirsat-Bhumre News, Aurangabad
Sanjay Shirsat-Bhumre News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटातील आमदारांवर ठाकरे गटाकडून गद्दार, बोके, खोके अशी टाका केली जात आहे. सुरूवातीला शिंदे गटातील आमदार या टीकेला जशासतशे उत्तर द्यायचे, पण आता त्यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे. शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील पाच आमदारांनी सहभागी होत (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना धक्का दिला होता.

Sanjay Shirsat-Bhumre News, Aurangabad
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना तिळगुळ द्यायला आवडेल..

पैकी पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) व पैठणचे संदीपान भुमरे त्यात आघाडीवर होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी उद्धवसेना कामाला लागली आहे. (Shivsena) असे असले तरी मतदारसंघात मात्र या दोन्ही नेत्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील एका समर्थकाने या दोघांची चक्क रथातून मिरवणूक काढत त्यांचा सत्कारही केला.

या रथातील मिरवणूकीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे यासाठी शिरसाट आणि भूमरे दोघेही एकाचवेळी प्रयत्न करत होते. भुमरे यांनी एका भाषणात याचा मोठा मजेशीर किस्सा देखील सांगितला होता. आम्ही दोघं एकाच गाडीत मुंबईला जायचो, पण मंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना स्वंतत्र भेटायचो, अशी कबुलीच भुमरे यांनी दिला होती.

पण तेव्हाही शिरसाट यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. आता शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्ता आली, पण शिरसाट मंत्रीपदासाठी वेटींगवरच आहे. पण मतदारसंघात भरघोस निधी, योजना आणत त्यांनी ही कसर भरून काढली असेच म्हणावे लागेल. त्यामुळे मतदारसंघात कुठे ना कुठे शिरसाटांचा सत्कार, स्वागत होतच असते.

विशेष म्हणजे आजच्या सत्कारात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना देखील सहभागी करून घेतले. शहरातील ज्योतीनगर भागात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे शिरसाट-भुमरे भारावून गेले होते. यातून त्यांनी विरोधकांना एक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या सत्काराच्या निमित्ताने `बाळासाहेबांची शिवसेना` शाखेचे उद्घाटन देखील या दोघांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in