महापुरुषांसह गोपीनाथ मुंडे, सुंदरराव सोळंखेंचा पुतळा उभारणार

जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी शब्द पाळल्याने शंभूप्रेमींनी त्यांचे आभार मानले आहे.
Gopinath Munde & Sundarrao Solanke
Gopinath Munde & Sundarrao SolankeSarkarnama

बीड : जिल्हा परिषदेच्या (Beed ZP) नुतन प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज, (Chhatrapati Sambhaji Maharaj) छत्रपती राजर्षी शाहू महाराज, (Chhatrapati Shahu Maharaj) महात्मा जोतिराव फुले, (Mahatma Jotirao Fule) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यासह दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) व दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके (Sundarrao Solanke) यांचे पुतळे उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले.शंभूप्रेमींची मागणी आणि लढ्याला अखेर यश आले आणि जिल्हा परिषदेने शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) याबाबतची निविदा प्रसिद्ध केली. पुतळे उभारणीचे दिलेले आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी पाळल्याने शंभूप्रेमींनी त्यांचे आभार मानले आहे.

Gopinath Munde & Sundarrao Solanke
राष्ट्रपती रायगडावर येणार कसे? अखेर ठरलं!

जिल्हा परिषदेच्या चार मजली प्रशासकीय इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे. लवकरच या ठिकाणी कारभार स्थलांतरीत होणार आहे. मात्र, या नुतन इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी शंभूप्रेमींनी केली होती. याबाबत काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही संमत झाला होता. या ठरावाची अंमलबजावणी करुन शंभूराजेंचा पुतळा बसवण्यासाठी निवेदने, धरणे आंदोलनही करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी भेट देऊन पुतळे उभारण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि निधी उपलब्ध करुन विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते.

Gopinath Munde & Sundarrao Solanke
आमदार रोहित पवार यांची मंत्रीमंडळात वर्णी?

अखेर शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यासह त्यांचे शौर्यशिल्प, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळे आणि गोपीनाथराव मुंडे व सुंदरराव सोळंके यांचे पुर्णाकृती पुतळे उभारणीची निविदा जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली आहे. तसेच,

नोंदणीकृत शिल्पकारांकडून दरपत्रक मागिवले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री अशी मोठी मजल मारुन जिल्ह्याचे नाव देशभर गाजविले. तर, त्यापूर्वी सुंदरराव सोळंके यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रीपदाच्या विविध खात्यांमार्फत अनेक विकास कामे केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com