राज ठाकरे हाजीर हो ! शिराळानंतर परळी न्यायालयानेही काढले अजामीनपात्र अटक वॉरंट

Raj Thackeray news| Arrest Warrant| राज ठाकरे यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा (32 Shirala) प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
Raj Thackeray news|
Raj Thackeray news|

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा (32 Shirala) प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यात राज ठाकरे यांना धरुन कोर्टात हजर करा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात आले. हे प्रकरण ताजे असतानाच आता बीडच्या परळी न्यायालयानेही राज ठाकरे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या मराठी पाट्या आणि मराठीच्या (marathi) मुद्द्यावरील आंदोलनाप्रकरणी परळी न्यायालयाने मुंबई पोलिसांना पत्रं पाठवलं होतं. पण मुंबई पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर आता न्यायालयाने राज यांच्याविरोधात थेट अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यावर आता मुंबई पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray news|
वानखेडेेंचे जात प्रमाणपत्र रद्द होणार? थेट नोटीस पाठवल्यानं वाढल्या अडचणी

आधीच भोंग्याच्या मुद्द्यावरून चारी बाजूंनी अडचणीत आलेल्या राज ठाकरे यांना आता जुन्या प्रकरणातही अजामीनपात्रं वॉरंट जारी करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच सांगलीच्या शिराळा कोर्टाने राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्रं वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. गुडीपाडव्याच्या भाषणापासून औंरगाबादेतील सभेपर्यंत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात त्यांनी आक्रमकपणे भाषणे दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल झाले आहेत. भोंग्याचं राजकारण आणि त्यावरून कारवाईची टांगती तलवार असतानाच आता राज यांच्यावर जुन्या प्रकरणांवरुन वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे कार्यकर्त्यांनीराज यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि अनेक मनसैनिक राज यांच्यासोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com