विकासनिधीवरुन पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात जुंपली

Pankaja Munde| Dhananjay Munde| पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून ट्वीटर युद्ध सुरू झाले आहे.
Dhananjay Munde| Pankaja Munde
Dhananjay Munde| Pankaja Munde

बीड : राज्यात भाजपचे सरकार आल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोड मध्ये आल्या आहेत. पण त्यांचे चूलत भाऊ आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. केंद्र सरकारकडून परळीत दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी १०० कोटींचा निधीवरुन दोघांमध्येही ट्विटर वॉर सुरु झाले आहे.

केंद्रीय मंत्रालयाने परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीवरुन पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादारवरून ट्वीटर युद्ध सुरू झाले आहे. आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा या दोघांनीही केला आहे.

Dhananjay Munde| Pankaja Munde
काँग्रेसमध्ये राऊतांची पाहुणी कोण? संतोष बांगरांनी मांडली कैफियत

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या विस्तारीकरणासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर आंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठीही देण्यात आला आहे. त्यावर या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी परळीला मिळाल्याचा दावा करत गडकरींचे आभार मानले आहेत.

धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनीही हा निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे. दोघांनीही ट्वीट करत आपणच निधी आणल्याचे सांगितले आहे. मात्र या श्रेयवादात हा निधी परत जाऊ नये, याची भिती आता जनतेतून व्यक्त होत आहे.

तर पाच वर्षे आपण सत्तेत नव्हतो, पण इथले लोक प्रतिनिधी राज्याच आणि केंद्रात सत्तेत असतानाही आपला निधी थांबवू शकले नाहीत. परळीत येणारा निधी कोणी अडवू शकलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं, आणि मंत्री कोण होते, याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकासाचा पैसा कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com