निलंग्यात माजी मुख्यमंत्री डॅा. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे होणार भव्य स्मारक

माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Nilangekar Patil) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला.
Shivajirao Nilengekar-Patil
Shivajirao Nilengekar-PatilSarkarnama

निलंगा : महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात महत्वपुर्ण योगदान देणारे विकासपुरुष, काळाची पाऊले ओळखून महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय घेणारा द्रष्टा राजकारणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा अखेरपर्यंत जपणारे निष्ठावंत नेतृत्व, सर्वच क्षेत्रात आपल्या नैतिकतेचा दबदबा निर्माण केलेले नैतिकतेचे महामेरु माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Nilangekar Patil) यांच्या स्मारकाच्या (memorial) भूमिपूजनाचा कार्यक्रम निलंगा येथील महाराष्ट्र शिक्षण समितीच्या संकुलात शुक्रवारी (ता.18 फेब्रुवारी) रोजी संपन्न झाला.

Shivajirao Nilengekar-Patil
मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री?- किरीट सोमय्या

कै. निलंगेकर यांनी महाराष्ट्र शिक्षण समितीची स्थापना करुन तळागाळातल्या लोकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहंचवली त्याच शिक्षण समितीच्या प्रांगणात कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. निलंगेकरांचे हे स्मारक नविन पिढीला प्रेरणा व दिशा देणारे ठरणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी कै. डॉ. निलंगेकरांच्या पत्नी सुशिलाबाई पाटील निलंगेकर, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. शरदराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे चिटणीस अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. अरुण डावळे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. सर्वेश पाटील निलंगेकर, संगिताताई अशोकराव पाटील निलंगेकर, वृषालीताई विजय पाटील निलंगेकर, व सर्व कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

Shivajirao Nilengekar-Patil
माजी वनमंत्री अधिकाऱ्यांवर बरसले; म्हणाले, नेता बनू नका, उभे राहून काम करून घ्या...

भूमिपूजन समारंभ स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भागवत पौळ, सचिव दिलीपराव धुमाळ, सदस्य प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मुख्याध्यापक मोहन नटवे, मुख्याध्यापक गुंडादेव पाठक, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे, डॉ. भास्कर गायकवाड, शिला देशमुख, सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी निलंगा विधानसभा मतदार संघातील प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महाराष्ट्र शिक्षण समितीतील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com