वर्ग मित्र म्हणाला, दादा कुठे चालले अन् दानवेंनी त्याला घडवली पूर्वोत्तर राज्यांची सफर

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यासोबत आगरताळा येथे बन्सीधर यांना बघून कुतुहलाने विचारपूस केली. तेव्हा दानवे यांनी हे माझे शालेय वर्गमित्र असल्याचे सांगितले. (Raosaheb Danve)
Railway State Minister Raosaheb Danve
Railway State Minister Raosaheb DanveSarkarnama

भोकरदन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या ग्रामीण जीवनशैली आणि खुमासदार भाषणासाठी ओळखले जातात. (Raosaheb Danve) त्यांचे साधे राहणे, लोकांमध्ये मिसळणे, हातावर ठेचा भाकरी घेऊन खाणे ते घरात स्वःताच्या हाताने भाकरी थापण्याच्या त्याच्या कलेमुळे त्यांच्या राजकारणात एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. (Jalna) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यापासून दानवे सतत देशभरातील राज्यांच्या दौऱ्यावर असतात. (Marathwada)

त्यामुळे भोकरदनमधील त्याचे मित्र व कार्यकर्ते ते आले की भेटायला जातात. दानवेंनाही त्यांच्या रमायला आवडते. असाच एक जुना वर्ग मित्र नुकताच दानवेंना त्यांच्या घरी जाऊन भेटला. दानवे पुन्हा दौऱ्याच्या तयारीत होते, त्यांची लगबग पाहून त्या मित्राने उत्सूकतेने विचारले दादा कुठे चाललांत, तेव्हा मी बाहेरच्या राज्यात चाललोयं येतो का माझ्या बरोबर असे म्हटले. मित्रानेही सहज चल येतो म्हटले आणि रावसाहेब दानवे त्याला चक्क विमानातून आपल्या सोबत पुर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर घेऊन गेले.

अगदी त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोत देखील ट्रावझर, शर्ट आणि टोपी घातलेली ही एक साधी व्यक्ती दिसते. नेमकी ही व्यक्ती कोण असा प्रश्न तिथल्या नेत्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पडला. तेव्हा हा माझा वर्ग मित्र आहे, असे दानवे अभिमानाने सांगत होते. दानवे यांच्या या मित्रप्रेमाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रावसाहेब दानवे हे गेल्या चार दिवसापासून पुर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत एक साध्या पेहरावातील गळ्यात रुमाल, पांढरा शर्ट, ट्रावझर आणि डोक्यावर टोपी घातलेली व्यक्ती सावली सारखी वावरतांना दिसली.

दानवे देखील या व्यक्तीला महत्व देत असल्याने नेमके हे गृहस्थ कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. तर ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून ते दानवे यांचे वर्ग मित्र आहेत. त्याचे झाले असे की, दानवे रविवारी मतदार संघातील सर्व कार्यक्रम, लग्नकार्य आटोपून दिल्लीकडे निघत असताना जालन्याला त्यांचे आठवी ते मॅट्रिकपर्यंत सोबतअसणारे वर्गमित्र बन्सीधर ठमाजी आटोळे हे त्यांना भेटले. दानवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विचारले "दादा तुम्ही कुठे चालले ? ते म्हटले की मी आता पुर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर जात आहे चलतोस का ? खुद्द केंद्रीय मंत्र्याने विचारले म्हटल्यावर बन्सीधर लगेच तयार झाले.

दानवे यांनी लगेच त्यांना सोबत घेतले विमानात आपल्या सोबत बसवून दिल्लीला नेले. भाटेपूरी जिल्हा जालना येथील रहिवासी असणारे शेती करणारे आटोळे अगदी पांढऱ्या कुर्ता पायजमा व गांधीटोपी अशा साध्या राहणीमानात दानवे सोबत दौऱ्यावर निघाले. दानवेनी त्यांना सोबत तर घेतले मात्र त्यांच्याजवळ ना कपडे, ना प्रवासाची बॅग, मग काय दानवे यांनी दिल्लीतच आपल्या या मित्रासाठी कपडे घेतले व आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात त्यांना सोबत घेतले.

Railway State Minister Raosaheb Danve
उच्छाद मांडला आहे; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती : प्रविण दरेकर

दानवे यांनी आसाम मधील बारपेटा येथे पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. रायपूर बांबू क्लस्टर, हाउली, बारपेटा भाजप कार्यालयाला भेट दिली. त्रिपुराच्या संस्कृतीसह माणिक्य राजवंशाची कथा सांगणाऱ्या उज्जयंता पॅलेस या सर्व ठिकाणी बन्सीधर हे दानवे यांच्या सोबत होते. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यासोबत आगरताळा येथे दानवे यांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा बन्सीधर यांना बघून त्यांनी कुतुहलाने विचारपूस केली असता दानवे यांनी हे माझे शालेय वर्गमित्र असल्याचे सांगितले.

बिप्लब कुमार हे ऐकूनआश्चर्यचकित झाले व दानवे यांना म्हटले की "आजही तुम्ही जुन्या वर्ग मित्रांना विसरले नाही हे विशेष ! दानवे व बिप्लब कुमार हे दोघेही प्रदेशाध्यक्ष असतांना या दोघांमध्ये नेहमी संवाद व्हायचा. त्यामुळे दानवे यांचे हे मित्र प्रेम पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. एकूणच दानवेंमुळे या जुन्या वर्ग मित्राला हवाई सफरी सोबतच चार राज्यांमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याने ते जाम खूश होते.

दानवे यांच्या या धक्कातंत्रामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. दानवे जेव्हा आपल्या मतदारसंघात हेलीकाॅप्टरने येतात तेव्हा ते हेलिकाॅप्टर रिकामे जाते म्हणून त्यांनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हेलीकाॅप्टरची सफर देखील घडवली आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुण्याहून परत येण्याची व्यवस्था देखील दानवे करतात, त्यामुळे त्यांचे समर्थक नेहमीच त्यांच्यावर खूष असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com