Crime News : गुन्ह्यात मदत अन् जेवणासाठी लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल..

Aurangabad : गुन्ह्यात फिर्यादीला समजावणे आणि मदत करण्यासाठी पवार याने ८० हजार लाच मागितली होती.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime NewsSarkarnama

Aurangabad : एका गुन्ह्यात मदत करतो म्हणून लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने चक्क जेवणासाठी १५०० रुपये आॅनलाईन अॅपच्या माध्यमातून स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Paithan) पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्याने ही लाच मागितली असून या प्रकरणी पोलिस कर्मचारी व त्याला मदत करणाऱ्या एका पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News
Mahavitaran News : महावितरण अभियंत्याला तीस हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले!

लाचलूचपत विभागाच्या (Aurangabad) या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी विजय पवार या पोलिक कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली. बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत आहे. त्याला डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल (Fir Filed) करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यातील तक्रारदारा विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात फिर्यादीला समजावणे आणि मदत करण्यासाठी पवार याने ८० हजार लाच मागितली होती. दरम्यान ५० हजार रुपये तडजोड झाली आणि त्यानंतर जेवणासाठी देखील आणखी दोन हजार रुपये त्याने मागितले.

त्यापैकी १५०० रुपये त्याने आॅनलाईन स्वीकारल्याचे सिद्ध झाले. तडजोडीची लाचेची रक्कम ठरवण्यासाठी डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण याने मध्यस्थी केली होती. पंच साक्षीदार समक्ष गुलाब चव्हाण याने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com