Hingoli : गद्दारांच्या गाड्या फोडा म्हणणाऱ्या शिवसेनेच्या थोरातांवर गुन्हा दाखल

गद्दारांना गावात फिरू देऊ नका, जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छूक असणाऱ्यांनी गद्दारांची गाडी जो पहिले फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल, असे विधान थोरातांनी केले होते. (Shivsena)
Fir Filed Against Shivsena Leader Babanrao Thorat News Hingoli
Fir Filed Against Shivsena Leader Babanrao Thorat News HingoliSarkarnama

हिंगोली : शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या गाड्या फोडा आणि जिल्हाप्रमुख पदासह उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर सन्मान स्वीकारा, असे चिथावणीखोर आवाहन केल्याप्रकरणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्याविरोधात (Hingoli) हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महावीर भवन येथे काल पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात थोरात यांनी आक्रमक भाषण केले होते. (Shivsena) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालविणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या आमदार, खासदारांना धडा शिकवा. त्यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन थोरात यांनी केले होते. (Marathwada)

त्याला बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आव्हान देत ` तुमच्या घरासमोर गाडी आणून उभी करतो, हिमंत असेल तर फोडून दाखवा, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं`, असं प्रति आव्हान दिलं होत. अखेर थोरात यांच्या चिथावणीखोर विधानाच्या विरोधात आज हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीवरून पोलिसांनी बबनराव थोरात यांच्यावर गुन्हा दाखल केला. सचिन पवार नावाच्या तरूणाने या संदर्भात तक्रार दिली होती. राज्यात सर्वत्र सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष पहायला मिळत आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी बंडखोरी करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यात धुसफूस सुरू आहे.

Fir Filed Against Shivsena Leader Babanrao Thorat News Hingoli
Aurangabad : ईडी, सीबीआयने भाजप नेत्यावर कारवाई केल्याचे दाखवा, एक लाख मिळवा..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी नव्याने संघटना बांधणी करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले होते. काल झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बबनराव थोरात यांनी गद्दारांना गावात फिरू देऊ नका, जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छूक असणाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गद्दारांची गाडी जो पहिले फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल, असे विधान केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com