मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माविरुद्ध गुन्हा दाखल

Dhananjay Munde|Karuna Sharma: येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माविरुद्ध गुन्हा दाखल
Karuna Sharma Latest NewsSarkarnama

पुणे : महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह करुणा शर्मा विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर त्या प्रकाशात आल्या होत्या. (Karuna Sharma Latest Marathi News)

Karuna Sharma Latest News
विधान परिषद निवडणूक हरल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा...

अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा. सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नांजली अजयकुमार देडे (वय 23, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Karuna Sharma Latest News
video भाजपचे अनेकजण माझ्या संपर्कात - एकनाथ खडसे

हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 30 मे या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अजयकुमार देडे यांची काही वर्षांपुर्वी लग्न झाले आहे. दरम्यान, देडे यास पत्नीपासून घटस्फोट पाहीजे होता. त्यानंतर फिर्यादीचा पती व करुणा शर्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, करुणा शर्मा हिने फिर्यादीस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, दोघांनीही फिर्यादीने घटस्फोट द्यावा, यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने फिर्यादीसमवेत अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवून त्यांना मानसिक व शारिरीक त्रास दिला, अशी माहिती फिर्यादीने आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in