Railway Officer Bribe News : पाच हजारांची लाच पडली महागात; रेल्वेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Crime News : तक्रारदाराने नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्णा रेल्वे विभागात पिकअप वाहन उपलब्ध केले होते.
Pune ACB News
Pune ACB NewsSarkarnama

Nanded Bribe News : वाहनाचे थकीत बिल काढून देण्याच्या मागणीसाठी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. एम. शिवय्या असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयच्या पथकाने कारवाई केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्णा रेल्वे विभागात पिकअप वाहन उपलब्ध केले होते. (Bribe News) महिन्याकाठी प्रत्येकी वाहनाला 47 हजार 999 वाहन भाडे रेल्वे विभागाकडून दिले जाणार होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून तक्रारदाराला पैसे काही मिळाले नाहीत. जवळपास 34 लाख 55 हजार 928 रुपये एवढं बिल थकीत होतं.

Pune ACB News
Niphad Maratha News : जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सरणावर बसून उपोषण

थकीत बिल मिळवण्यासाठी तक्रारदाराने इलेट्रिकल विभागातील वरिष्ठ अभियंता एम. शिवय्या यांच्याकडे मागणी केली होती. तेव्हा एम. शिवय्याने दहा हजार रुपयांची मागणी केली होती. पाच हजार हजार रुपये स्वीकारले होते. उर्वरित पाच हजार रकमेसाठी तगादा लावला होता. त्यामुळे 7 सप्टेंबरला तक्रारदाराने पुण्यातील सीबीआयच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. सीबीआयच्या पथकानेही सापळा रचून त्याला रंगेहात अटक केली. त्याच्याच कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची उर्वरित रक्कम घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली.

पूर्णा येथील अधिकाऱ्यावरदेखील या पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी अधिकाऱ्याला नांदेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने अधिकाऱ्याला 14 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सीबीआय पथकाच्या या कारवाईने रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Pune ACB News
Rajgurunagar Administrative Building : अजितदादांची राजकीय खेळी; राजगुरुनगर प्रशासकीय इमारतीवरून रंगणार राजकारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in