गडकरींनी दिली खूषखबर : हाय वे वरील वेगमर्यादा वाढविणार

वाहनांचा वेग ९० च्या वर असेल तर दोन हजारांचा दंड आकारला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आता ही वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (Nitin Gadkari)
Central Minister Nitin Gadkari News
Central Minister Nitin Gadkari NewsSarkarnama

औरंगाबाद : गुरु पौर्णिमे निमित्त मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मठात दर्शनासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यात (Marathwada) आणखी दोन हजार कोटींचे नवे प्रकल्प करणार असल्याचे सांगितले. यात प्रामुख्याने औरंगाबाद ते पैठण हा पाचशे कोटींचा चौपदरी रस्ता, (Aurangabad)औरंगाबादमध्ये डबल डेकर पूल, शहरातून विमानतळाकडे जाणारा अखंड पूल अशी या रस्त्याची ओळख बनेल असेही गडकरी म्हणाले.

या शिवाय महामार्ग आणि एक्सप्रेसवरुन धावतांना सध्या असलेली वेग मर्यादा लवकरच उठवण्यात येईल, यासाठीचे नियम ठरवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. (Nitin Gadkari) देशात आणि राज्यात राष्ट्रीय महामार्गांसह एक्सप्रेस वे चे जाळे विनण्यात आले आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ वाचावा हा या मागचा हेतू होता. परंतु या वाहनांवर स्पीडगनच्या माध्यमातून लक्ष ठवले जाते.

ज्या वाहनांचा वेग ९० च्या वर असेल त्यांना दोन हजारांचा दंड आकारला जातो. त्यामुळ नागरिकांमध्ये नाराजी आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता महामार्गावरील वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे महामार्गावरील वाहने लवकरच सुसाट वेगाने धावतांना दिसतील.

या शिवाय पुणे-औरंगाबाद हा महामार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील गडकरी यांनी दिली २६८ कि.मी. चा हा महामार्ग असून याचा अंतिम आराखडा देखील तयार झाला आहे.

Central Minister Nitin Gadkari News
Aurangabad : आमदार शिरसाटांचे मंत्रीपदासाठी मुंबईत शक्तीप्रदर्शन ?

हा मार्ग पुर्ण झाल्यानंतर औरंगाबाद ते पुणे हे अंतर अडीच तासांत पुर्ण करता येईल, असेही गडकरी यांनी सागंतिले. सुरत-चेन्नईला हा महामार्ग जोडला जाणार असून तो समृद्धी महामार्गालाही कनेक्ट असेल. यासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in