मोठी बातमी : NCB कडून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरला जाणारा 111 किलो पॉपीस्ट्रॉ जप्त

नांदेड जिल्ह्यातील कारवाईनंतर चार दिवसातच NCB ने पुन्हा मोठी कारवाई केली आहे.
मोठी बातमी : NCB कडून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरला जाणारा 111 किलो पॉपीस्ट्रॉ जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) चार दिवसांपूर्वीचनांदेडमध्ये १०० किलो गांजा पकडला होता. या घटनेला चार दिवस उलटत नाही तोच ड्रग्ज तस्करीची आणखी एक बातमी समोर आली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पथकाने आणखी एका ठिकाणी छापेमारी करत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड केला आहे.

चार दिवसांपूर्वी नांदेडमधील कामाठा परिसरात आंध्रप्रदेशातून आलेल्या ड्रग्जने भरलेल्या ट्रकवर एनसीबीने छापा टाकला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. या दोघाची चौकशी केली असता त्यांनी नांदेडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रीची माहिती एनसीबीला दिली. या माहितीच्या आधार एनसीबीने सापळा रचून एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील कामठा येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाच्या आड सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रीवर छापा टाकत मुद्देमाल जप्त केला.

मोठी बातमी : NCB कडून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरला जाणारा 111 किलो पॉपीस्ट्रॉ जप्त
सरकारी पक्ष मोर्चे काढतात, मग आम्हाला परवानगी का नाही? : एमआयएम

या कारवाईबाबत समीर वानखडे यांनी माहिती दिली आहे. या कारवाई दरम्यान ड्रग्ज बनवण्यासाठी वापरला जाणारा 111 किलो पॉपीस्ट्रॉ मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने लॅबमधून ड्रग्ज बनवण्यासाठी वापरलेली सर्व मशीन्सही जप्त केली आहेत. यासोबतच दीड किलो अफू, 1.55 लाख रुपये रोख, आणि 1.30 किलो अफू आणि कॅश मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आल्याची माहिती वानखेडेंनी दिली आहे.

या प्रकरणात मुंबई एनसीबीने आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर अटक केलेल्या तिघांपैकी एक मालक असून तो रोड ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचा. या ड्रग्ज कारखान्यात केमिकल तयार होणारी औषधे देशातील विविध राज्यांमध्ये विकली जात होती. कोणालाही कळणार नाही, किंवा कोणालाही या लॅबचा ठावठिकाणा लागू नये, अशा ठिकाणी ही लॅब तयार करण्यात आली होती.

यासोबतच, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यांतून बेकायदेशीरपणे हे पॉपीस्ट्रॉ नांदेडमध्ये आणण्यात आले होते. हे पॉपीस्ट्रॉ पासून अफु बनवले जाते. तर हे पॉपीस्ट्रॉ हे सुकल्यानंतर त्याचा वापर हेराँइन बनवण्यासाठी केला जातो. याठिकाणी ड्रग्ज बनवल्यानंतर ते अनेक राज्यांना पुरवले जात होते. या कारवाईनंतर एनसीबीची नांदेड जिल्ह्यात छापेमारी सुरू असून हे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com