आर्यन खानच्या आधीही या' स्टारकिड्सनी खाल्ली आहे जेलची हवा

क्रूझवरील रेव्ह पार्टी (Rave Party) प्रकरणात आता न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आर्यन खान चांगलाच चर्चेत आला आहे.
Aryan Khan
Aryan Khan Sarkarnama

मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईहून (Mumbai) गोव्याला (Goa) जाणाऱ्या एका क्रुझ शिपवर (Cruise Ship) अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (NCP) छापा टाकला. या कारवाईत शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह १० जणांना अटक करण्यात आली. क्रूझवरील रेव्ह पार्टी (Rave Party) प्रकरणात आता न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आर्यन खान चांगलाच चर्चेत आला. या घटनेने बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला आहे. पण ड्रग्ज प्रकरणात किंवा इतर गुन्ह्यात तुरुंगात जाणाऱ्या कलाकरांच्या मुलापैकी आर्यन खान हा एकमेव मुलगा नाही, आर्यनच्या आधीही अनेक स्टारकिड्स (Star Kids) तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत.

Aryan Khan
त्या' घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या उजव्या हाताला नारायण राणे बसणार

संजय दत्त

तुरुंगाची हवा खाणाऱ्या बॉलीवडूमधील कलाकारांच्या मुलांमध्ये अभिनेता संजय दत्तचे पहिले नाव येते. १९९३ मध्ये संजय दत्तच्या घरातून अवैध शस्त्र मिळाल्याने त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्याच्या घरातून ही अटक करण्यात आली होती. संजय दत्तला टाडा आणि आर्म्स कायद्यांतर्गत ही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर ही शिक्षा कमी करून तीन वर्ष करण्यात आली. 2013 पासून 2016 पर्यंत संजय दत्त पुण्यातील येरवडा कारागृहात होता.

सलमान खान

अभिनेता सलमान खाननेही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. 2002 मध्ये वांद्रेच्या फुटपाथवर आपली कार चढवली. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला आणि चार लोक गंभीर जखमी झाले होते. सलमानने दारूच्या नशेत गाडी फुटपाथवर चढवली असल्याचे म्हटले जाते. या प्रकरणात त्याला सलमान अनेक दिवस तुरुंगात होता. पण नंतर त्याला जामीन मिळाला. त्यानंतर 2015 मध्येही कनिष्ठ न्यायालयाने अभिनेता सलमान खानने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली. आपण कार चालवत नव्हतो, तर आपला ड्रायव्हर चालवत असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले होते.

सूरज पांचोली

अभिनेत्री जिया खानने 2013 साली गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरज पांचोलीला पोलीसांनी अटक केली होती. मृत्यूपूर्वी जियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. शारीरिक शोषण करणे, गर्भपात करण्यास भाग पाडणे असे गंभीर आरोप जियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केले होते. या प्रकरणात त्याला तुरुंगात जावे लागले. मात्र सूरज जियाच्या आत्महत्येला जबाबदार नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने सूरजला दिलासा दिला. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.

आर्यन खान

2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझ शिपवर अमली पदार्थ नियंत्रण पथकाने छापा टाकला. या शिपवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीतून शाहरुखचा मुलगा आर्यन खान सह आणखी १० जणांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी (ता.८) न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला असून त्याला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com