२१ कोटींची मेहेरबानी; सरनाईकांसाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Pratap Sarnaik यांच्यासाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sarkarnama

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य-सरकारने २१ कोटींची मेहेबानी केली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर एका आमदारासाठी थेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचीही राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा केला जात आहे. या मेहेरबानीवर आता भाजप नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, अशी टीका केली आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सरकारकडून सरनाईक यांच्या या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होण्यापुर्वी मंत्रिमंडळ बैठकीची सूचना व कार्यसूची याबाबतची माहिती देणारा एक फोटो वायरल झाला होता. त्यामुळे आज हा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु होती.

Pratap Sarnaik
राज्यातील सर्वच्या सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत (मोठ्या अक्षरात) बंधनकारक

एकूणच या निर्णयामुळे ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर अचानक इतके मेहरबान का झाले आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. प्रताप सरनाईक हे मागच्या काही काळापासून ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत आले होते. त्यानंतर मध्यंतरी भाजपाशी जुळवून घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करत सरनाईक यांनी खळबळ उडवून दिली होती. मात्र हा निर्णय ठाण्यातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर पक्ष अद्यापही सरनाईक यांच्यामागे पक्ष उभा असल्याचा संदेश दिला जात असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.

Pratap Sarnaik
संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करताना भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, ठाणे येथील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in