महाराष्ट्रात काँग्रेसची चढती कमान; आता आगामी टार्गेटही केले स्पष्ट

Congress election 2022 : काँग्रेस या निवडणुकांच्या तयारीला लागले आहे.
Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok Thorat
Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok ThoratSarkarnama

मुंबई : ओबीसी आरक्षणामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्याच होणार की काही दिवस पुढे ढकलल्या जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या निवडणुका होवू नये यासाठी राज्य शासना आग्रही आहे, त्यासाठीचा ठराव देखील राज्य विधीमंडळात एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यानंतर आता चेंडू राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. तसेच या निवडणुकांमध्ये राज्यातील पक्ष स्वतंत्ररित्या उतरणार की महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) लढणार याबाबतचेही चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हे सगळे विचार बाजूला ठेवत आता काँग्रेस (Congress) या निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. तसे टार्गेटच काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

राज्यात मागच्या काही दिवसात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून पक्षाचा आलेख चढता राहिला आहे. त्यानंतर आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्येही काँग्रेसच येणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. काँग्रेसने ट्विट करत हा दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस म्हणते, नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा विजय, विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला. देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय. आता या सगळ्या यशानंतर राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस तयार असल्याचे या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok Thorat
जिम आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार, पण...

दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दोन दिवसांपुर्वी मुंबईत बैठक घेत महापालिका उमेदवारांचा शोधही सुरु केला आहे. ७ तारखेला मुंबईत नागपूर शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासोबतच इतरही निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यात वेळेवर उमेदवारांची शोधाशोध आणि कापाकापी करण्यापेक्षा आत्तापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार शोधून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय समीकरणे बघून उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok Thorat
ओवैसीचे नामोनिशाण मिटेल...आता तो दिवस दूर नाही! मुख्यमंत्र्यांनीच थेट दिली धमकी

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपविरोधात सर्वत्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. त्यामुळे आपसातील भांडणांमुळे नुकसान होऊ नये याची दक्षता यावेळी घेण्यात येईल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर आगामी निवडणूक कशी लढायची, जातीय व राजकीय समीकरण कसे ठरवायचे, सर्व नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देऊन समतोल कसा साधायचा, यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी प्रभाग रचना, बूथ रचना, उमेदवारांची निवड यावरही चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in