कॉग्रेसची मोठी घोषणा ; प्रदेश कार्यकारिणीची संख्या अडीचशेवर जाणार

नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बाळासाहेब थोरात या मंत्रीद्वयांनी सुचविलेली बहुतांश नावे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि सहप्रभारी वाम्शी रेड्डी, संपत कुमार तसेच बी. एन. संदीप यांच्या पातळीवर परस्पर कापण्यात आल्याचे आरोप होऊ लागले होते.

कॉग्रेसची मोठी घोषणा ; प्रदेश कार्यकारिणीची संख्या अडीचशेवर जाणार
Congresssarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश (Congress Maharashtra) कार्यकारिणीतील सदस्यांची संख्या आता अडीचशेवर जाण्याची शक्यता आहे. नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणीच्या नियुक्त्यांमध्ये स्थानिक नेत्यांच्या शिफारशी डावलून केंद्रातील नेत्यांकडून परस्पर बदल झाल्याचा आरोपानंतर राज्य कॉंग्रेसमध्ये उफाळलेला असंतोष शांत करण्यासाठी ४० अतिरिक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.

Congress
अजितदादांना आता कुटुंबिय आठवतेय का?

या कार्यकारिणी विस्तारामध्ये चार उपाध्यक्ष, १६ सरचिटणीस, १७ सचिव, २ कार्यकारी समिती सदस्य आणि १ प्रवक्ता अशा चाळीस जणांना सामावून घेण्यात आले आहे. नवनियुक्त उपाध्यक्षांमध्ये पद्माकर वळवी, सुनील देशमुख तर सरचिटणीसांमध्ये अभिजित सपकाळ, नामदेव उसेंडी, बलदेव खोसला ही नावे उल्लेखनीय आहेत. यासोबतच रत्नागिरी, गोंदिया,पिंपरी चिंचवड, अकोला शहर, गडचिरोली, जळगाव ग्रामीण,पालघर, कोल्हापूर शहर आणि धुळे शहर येथील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांनाही केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवाकंदील दाखविला आहे.

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष आणि सोबत चार कार्याध्यक्षांच्या सुरवातीच्या निवडीनंतर ऑगस्ट अखेरीस १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस, १०४ सचिव आणि १४ कार्यकारी समिती सदस्यांचा समावेश असलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही यादी जाहीर झाल्यानंतर खळबळ उडाली होती. नियुक्तीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बाळासाहेब थोरात या मंत्रीद्वयांनी सुचविलेली बहुतांश नावे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि सहप्रभारी वाम्शी रेड्डी, संपत कुमार तसेच बी. एन. संदीप यांच्या पातळीवर परस्पर कापण्यात आल्याचे आरोप होऊ लागले होते. पण काल चाळीस नव्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांची संख्या आता अडीचशेवर जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.