महाराष्ट्रातही राजस्थान पॅटर्नचे संकेत; पटोलेंचे मंत्रिमंडळात आगमन होणार?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना झाल्याने या चर्चांना हवा मिळाली आहे.
महाराष्ट्रातही राजस्थान पॅटर्नचे संकेत; पटोलेंचे मंत्रिमंडळात आगमन होणार?
Nana Patole, Uddhav Thackeray.jpgSarkarnama

मुंबई : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीच्या दौऱ्यावर रवाना झाल्याने या चर्चांना हवा मिळाली आहे. हा फेरबदल मुख्यतः काँग्रेस पक्षासाठी केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात काँग्रेसच्या एका मंत्र्याला नारळ देवून त्यांच्या जागी नाना पटोले आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणकी एका आमदाराचे मंत्रिमंडळात आगमन होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार असून पटोलेंच्या दिल्ली दौऱ्यात या नावावारही शिक्कामोर्तब होणार आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसच्या मंत्र्यांची भाकरी फिरवली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यात नाना पटोले यांची उर्जामंत्री नितीन राऊत यांचा राजीनामा घेवून त्यांच्या जागी वर्णी लागणार असल्याचे दावे मध्यंतरी केले जात होते. त्यावरुन नाराजी दिसून आल्याने पक्षश्रेष्ठी बदलापासून लांब राहिले.

Nana Patole, Uddhav Thackeray.jpg
शशिकांत शिंदेंच्या पराभवावर अजित पवारांचे भाष्य...

मात्र आता पंजाब आणि राजस्थानमधील बदलानंतर महाराष्ट्रातही बदल घडवण्याची दाट शक्यता आहे. विषेशतः काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये राजस्थान पॅटर्नचीही चर्चा जोरात आहे. त्यात पटोले मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

Nana Patole, Uddhav Thackeray.jpg
भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे पटोले 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाची साथ ओसल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यास मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारमधील प्रमुख नेते राजी आहेत. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यात या सगळ्यांच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in