महाराष्ट्र बंद : शिवसेना रस्त्यावर, 'बेस्ट'ची तोडफोड, पीएमपी बंद, शिवसैनिक ताब्यात

आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्र बंद : शिवसेना रस्त्यावर, 'बेस्ट'ची तोडफोड, पीएमपी बंद, शिवसैनिक ताब्यात
Maharashtra Bandhsarkarnama

बीड : लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. maharashtra bandh today over lakhimpur violence

Maharashtra Bandh
'महाराष्ट्र बंद'चा निर्णय राजकीय हेतूने ; भाजपचा आरोप

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना (shivsena) आक्रमक झाली आहे. सकाळीचं रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि याच बंदला यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. यावेळी शिवसेनेकडून व्यापाऱ्याला गुलाबाचं फुल देऊन आपली दुकान बंद करण्याच आवाहन केल आहे. यावेळी शिवसेनेचे नेते बप्पासाहेब घुगे, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर ,हनुमान जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत.

पंढरपूरमध्ये टायर जाळून निषेध

पंढरपूरमध्ये युवासेनेच्या वतीने संगम येथे महाराष्ट्र बंद ला उत्फुर्स प्रतिसाद मिळाला. शिवसेनेने टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध केला. माळशिरस तालुका युवा सेनेच्या वतीने आज तालुक्यातील संगम येथे युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज लखमीमपूर घटनेच्या निषेधार्थ संगम येथे टायर पेटवून आंदोलन करण्यात आले.

पुण्यात पीएमपी बससेवा बंद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलची सार्वजनिक बस वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत सार्वजनिक बस वाहतूक सेवा बंद ठेवण्याच्या सूचना पीएमपीएमएल प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बस डेपो मध्ये  बस जागीच उभ्या आहेत.

एसटीची सेवा सुरु

पुण्याच्या ग्रामीण भागातील राजगुरुनगर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाल्याने महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सकाळपासून एसटीची सेवा सुरु असल्याने नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत राजगुरुनगर आगारातून एसटीच्या लोकल वाहतुकसेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या असल्याने आज बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

'बेस्ट'ची तोडफोड

महाराष्ट्र बंदचा एसटी वाहतुकीवर सध्या तरी कोणताही परिणाम मुंबईत नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व गाड्या परळ, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला नेहरूनगर येथून बाहेर पडल्या आहेत.एकही गाडी अद्याप रद्द झालेली नाही बेस्ट बस आणि एसटी सुरू आहेत. सकाळी ८ वाजेपर्यत मुंबईतील सगळ्या अगरामधून एसटी बस नियमित सुरु आहेत. तर बेस्ट बस देखील सोडण्यात आले आहेत . पण आता पर्यंत काही ठिकाणी बेस्ट बस ची तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या आठ बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. काही तुरळक बस फेऱ्या सुरू आहेत. पोलिस संरक्षण मिळाल्यास इतर फेऱ्या देखील सुरू केल्या जाणार असल्याच प्रशासनाच म्हणणं आहे. बेस्टच्या काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काही आगरामधून बस सुटलेल्या नाही आहेत

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in