सध्या जे चालू आहे ते पाहता, मी इथेच बरी.. असं का म्हणाल्या पंकजा मुंडे ?

धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलतांना त्यांच्यामध्ये असलेला भावनिक हा गुण चांगला आहे, पण तोच त्यांचा वाईट गुण देखील असल्याचे पंकजा म्हणाल्या. (Pankaja Munde)
Bjp Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja MundeSarkarnama

मुंबई : राज्याच्या सर्वोच्च पदाव बसायला तुम्हाला आवडेल का ? असा प्रश्न जर एखाद्या राजकारण्याला विचारला तर तो लगेच हो असे उत्तर देईल. पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्रीपदात अजिबात रस नाही. सध्याची परिस्थिती पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असे म्हटले आहे. एका कार्यमाच्या निमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत पकंजा मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं पंकजा मुंडे यांच्या बाबतीत बोललं जातं. यावरून त्यांच्या पक्षात बराच गदारोळ देखील झाला होता. (Maharashtra) ते पाहता आता त्यांनी मुख्यमंत्रीपदात आपल्या रस नसल्याचे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. (Bjp) राजकारणातील आपली जडणघडण, शालेय, महाविद्यालयीन आठवणी, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींवर भरभरून बोलतांनाच त्यांनी राजकारणातील अनेक नेत्यांबद्दल आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, वडील म्हणून बाबा आमची खूप काळजी घ्यायचे. ते स्वतःला नशीबवान समजायचे कारण त्यांना सगळ्या मुली आहेत. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वासोंबतच आम्ही शिकावं असं त्यांना नेहमी वाटायचे म्हणून त्यांनी आम्हाला गावातल्या शाळेतच शिकवले. पुढे मुंबईत आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण इथे झाले. पुढच्या संपुर्ण वैयक्तिक आणि राजकीय प्रवासात बाबांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. राजकारणात पराभवाने खचायचे नसते हे त्यांनी मला शिकवले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तुम्ही कौतुक करता, यावर माझे त्यांच्यांशी कौटुंबिक संबंध, जिव्हाळा आहे. तो आम्ही जपतो, राजकारण आणि पक्ष म्हणून भूमिका मांडतांना मी टीकाही करते. ओबीसी आरक्षण आणि कोविडच्या अनुषंगाने मी अनेकदा माझी सरकारबद्दलची भूमिका मांडली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संयमी नेते आहेत. पण त्यांना काही वाटत असेल, मनात गैरसमज असेल तर त्यांनी ते व्यक्त करायला हवेत, मनात ठेवू नयेत. अशी अपेक्षा देखील पंकजा यांनी व्यक्त केली.

Bjp Leader Pankaja Munde
Aurangabad : खैरेंच्या आरोपावर वंचित आक्रमक, तर एमआयएमचे दुर्लक्ष...

राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करणारे आहे, त्यांची ताकद मोठी आहे, तेव्हा त्यांनी आता व्यापक भूमिका घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात सध्या प्रतिस्पर्धी असलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलतांना त्यांच्यामध्ये असलेला भावनिक हा गुण चांगला आहे, पण तोच त्यांचा वाईट गुण देखील असल्याचे पंकजा म्हणाल्या. त्यांनी भावनेत वाहून जाणे टाळावे, असा सल्ला देखील पंकजा यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com