संगीत महाविद्यालयाचा नारळ फुटणार पण मुंबई विद्यापीठामुळे लता दीदींच्या अनुपस्थितीत...!

Lata Mangeshkar : मुंबई विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात...
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSarkarnama

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्वप्नातील संगीत महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला असून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या बाबतची घोषणा केली. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील आणि राज्यातील पहिले संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि केवळ संगीत महाविद्यालयच नाही तर म्युझियम देखील होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वी महाविद्यालयाला दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार होते. मात्र कुटुंबांनी केलेल्या सूचनेनुसार आता या महाविद्यालयाचे नाव 'लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय' करण्याचा निर्णय झाला आहे. जागेचाही प्रश्न सुटला आहे. आता मुंबई विद्यापीठाकडे जागा मागण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील आणि राज्यातील पहिले संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Lata Mangeshkar
रामदास आठवले यांनी दाखवल्या शशी थरूर यांच्या स्पेलिंग मिस्टेक

मंत्री सामंत बोलताना पुढे म्हणाले, मंगेशकर कुटुंबियांची नाराजी व्यक्त केली ती म्हणजे, दिवंगत लता मंगेशकर यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या समितीने ज्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण आहे तिथे हे संगीत महाविद्यालय व्हावे अशी शिफारस केली होती. मात्र मुंबई विद्यापीठाने त्यांच्याकडील जागा देण्यास काही अडचणीमुळे नकार दिला. त्यामुळे आता मुंबई विद्यापाठीच्या बाहेर हे संगीत महाविद्यालय होणार आहे. या सोबतच विद्यापीठाने जर त्यावेळी जागा दिली असती तर लता दीदींच्या हयातीत त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झाले असते, त्यामुळे सर्वांनाच बरं वाटलं असतं, अशी खंतही सामंत यांनी व्यक्त केली.

Lata Mangeshkar
संभाजीराजे यांच्या मनात काय चाललंय? भाजपची साथ सोडायच ठरतंय...

यापेक्षा मोठं स्मारक दीदींसाठी असू शकत नाही....

सध्या दिवंगत लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे अशी मागणी सुरु आहे. मात्र त्याला काही संघटनाकडून विरोध देखील होत आहे. त्यावर हा अनावश्यक वाद थांबवण्याचे आवाहन पंडित ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याचे अश्वासन दिले होते, याची विनंती स्वतः दीदींना केली होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी अतिशय आनंदानी ही विनंती मान्य सुद्धा केली होती. त्याची आता सर्व पूर्व तयारी शासनाने केली आहे. त्यामुळे या पेक्षा मोठे स्मारक दीदींसाठी होणे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com