Yogesh Kadam: '' उद्धव ठाकरेंनी आजवर कोणालाही मोठं होऊ दिलेलं नाही, त्यांच्या पक्षात जाणं म्हणजे...''

Ratnagiri News : २०१९ पासून आपल्याला संपवण्याचाच उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न..
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

MLA Yogesh Kadam on Sanjay Kadam : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याकडून सातत्याने उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका केली जात आहे. त्याला ठाकरे गटातील नेतेमंडळींकडून देखील जोरदार प्रत्युतर दिले जात आहे. मात्र, ठाकरे गटाने कदम पिता पुत्रांना कोंडी करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

मात्र, याचवेळी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी संजय कदमांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर मोठं विधान केलं आहे.

Uddhav Thackeray
Politics : ''...आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय..''; ठाकरे गट-वंचित युतीवर आंबेडकरांची मिश्किल टिप्पणी

आमदार योगेश कदम हे रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय कदम यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे.

कदम म्हणाले, २०१९ पासून आपल्याला संपवण्याचाच उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असून त्यांनी आजवर कोणत्याही नेत्याला मोठं होऊ दिलेलं नाही. तिकीट वाटपाच्यावेळी अनिल परब यांनी संजय कदम यांना मातोश्रीवर नेले होते. योगेश कदमला तिकीट देऊ नका अशी परबांची मागणी होती. परंतु, मी २०१६ पासून मतदारसंघात सक्रिय असल्यानं अनिल परब यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु, आता संजय कदम ठाकरे गटात गेल्यास अनिल परब यांना स्वत:ची जुनी इच्छा पूर्ण करता येईल अशी खोचक टिप्पणीही योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली.

Uddhav Thackeray
Kolhapur News : ज्योतिरादित्य शिंदेंचा कोल्हापूरी पाहुणचार; भरलं वांग,झणझणीत ठेच्यावर ताव

यावेळी कदम म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कोणत्याही नेत्याला कधीच मोठे होऊ देत नाहीत. त्यामुळे संजय कदम यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ठरणार आहे. तसेच त्यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशाला आपण महत्त्व देत नाही. त्यांच्यात जर का राजकीय हुशारी असती तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता. मी तर संजय कदम हे कधी उद्धव ठाकरेंकडे जाताहेत याची वाटच बघत होतो. त्यामुळे संजय कदम ज्या दिवशी प्रवेश करतील त्यादिवशी मला आनंद झालेला असेल अशी उपरोधिक टोलाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी लगावला.

माजी आमदार संजय कदम २०१३ साली शिवसेने(Shivsena)तून राष्ट्रवादी गेले. त्यावेळी त्यांनी भगवा ध्वज जाळला होता. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनरही फाडले होते आणि अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे स्वीकारला तयार झाले आहेत. याचाच अर्थ सूड उगवण्यासाठी त्यांची खालच्या पातळीला जाण्याची तयारी आहे असा हल्लाबोलही आमदार योगेश कदम यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in