Konkan News : योगेश कदमांना संपवण्याचे कसे प्रयत्न झाले, त्याचा साक्षीदार; उदय सामंतांनी सगळंच सांगितलं

Uday Samant : दापोलीत राष्ट्रवादी रुजविण्याचा ठाकरेंचा प्रयत्न
Uday Samant
Uday SamantSarkarnama

CM Eknath Shinde : आमदार योगेश कदम यांना संपविण्यासाठी कसे प्रयत्न झाले, त्याचा साक्षीदार असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला उत्तर देण्यासाठी आज रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने सभेचे आयोजन केले. त्यावेळी सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सामंत म्हणाले, "योगेश कदमांना राजकीय कसे सपंवयाचे याचे षडयंत्र कसे रचायचे त्याबाबत झालेल्या बैठकीला मी होतो. मंडणगण आणि दापोली नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटे द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. योगेश कदम शिवसेनेचे आमदार मात्र राष्ट्रवादीला जास्त तिकीटे देण्याचा अलिखीत नियम केला, तसे आदेश झाले. त्यावेळी योगेश कदमांना मी सांगितले की तुम्ही आठ तिकटे घ्या. नंतर चार, दोन, त्यानंतर त्यांना काहीच द्यायचं नाही, असे ठरले. त्यानंतर राष्ट्रवादीला जास्त तिकीटे देऊन योगेश कदमांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी रुजविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा मी साक्षदार आहे. आपल्याच आमदाराचे खच्चीकरण करण्याचा डाव रचण्यात आला. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली रामदास कदम यांनी मोडून काढला."

Uday Samant
Ramdas Kadam : रामदासभाईंना संपवण्याचं कट-कारस्थान मोतोश्रीवर रचलं गेलं : योगेश कदमांचा ठाकरेंवर घणाघात!

यावेळी सामंत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खेडमधील सभेवर टीका केली. सामंत म्हणाले, ५ मार्च रोजी झालेली उद्धव ठाकरेंची सभा कॉर्नर सभा होती. ती सभा विचार देणारी नव्हती, शिवीगाळ देणारी होती. अनेक सरकार गेली. अनेकांना पायउतार व्हावं लागलं. आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी आम्हाला गुवाहटीला नेऊन आणलं. तो घाव त्यांच्या इतक्या वर्मी लागला आहे की ते त्यातून आणखी बाहेर आलेले नाहीत. आजची सभा म्हणजे कोकणाने पुन्हा निश्चय केला की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासोबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले.

सामंत यांनी पालकमंत्री म्हणून योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मतदारसंघाला जास्त निधी देणार असल्याचे अश्वासन दिले. सामंत (Uday Samant) म्हणाले, "योगेश कदमांना संपविण्यासाठी मागच्या वेळी आपल्यासोबत काय झालं हे मी पाहिलं आहे. आपल्याला ७६ लाख दिले राष्ट्रवादीसाठी ६ कोटी दिले गेले, त्याचा मी साक्षीदार आहे. नारायण राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी कुणी नाही म्हणून मला तिथला पालकमंत्री केले. मी विश्वासाने सांगतो की माझा मतदार संघात कमी निधी देऊन पण योगेशला काही कमी पडून देणार नाही. बाळासाहेबाचे विचार पुढे नेहण्याचे काम हे मुख्यमंत्री करत आहे. उद्या परत काही तरी सुरू होईल. पण लोकांच्या चेहऱ्यावरचा स्थायी भाव आम्ही पाहिला आहे. भविष्यात पाचही आमदार हे तुमचे असतील असा विश्वास देतो."

Uday Samant
Hindu Jan Jagran March News : दंगा करायला नाही, हिंदूंना जागरूक करायला आलोय..

सामंत यांनी कोकणसाठी राज्य सरकारने दिलेल्या निधीची यादीही यावेळी सांगितली. सामंत यांनी सांगितले, "बजेटमध्ये कोकणातील रस्त्यांसाठी पावणे चारशे कोटी दिले, सिंचनासाठी ३५० कोटी दिले. अतिवृष्टी होत असल्याने कोकणाचे नुकसानही मोठे होते. त्यातून येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे ८०० कोटींचा निधी कोकणासाठी दिला आहे. ठाकरे त्यांच्या सभेत अडीच वर्षांत काय केले, हे सांगतील असे वाटत होते. मात्र माझ्या हातात काही नाही असे म्हणत त्यांनी हात वर केले. आज एकनाथ शिंदे देण्यासाठी आलेले आहेत."

यावेळी सभेला झालेल्या गर्दी पाहून त्यांनी योगेश कदम यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही व्यक्त केला. सामंत म्हणाले, "माध्यमांनी कॅमेरे जरा आमच्यापेक्षा मागे फिरवावेत. लांबपर्यंत नागरिकांची झालेली गर्दी पहायला मिळेल. ही झालेली गर्दीच योगेश कदम यांच्या विजय निश्चित आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com