Bhaskar Jadhav यांना अटक होणार?

Bhaskar Jadhav news | भास्कर जाधव यांनी भाजपावर आणि एकंदरीतच शिंदे गटावर तोंडसुख घेतलं.
Bhaskar Jadhav |
Bhaskar Jadhav |

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी जाधव यांच्याविरोधात जाधव (Bhaskar Jadhav) कुडाळ (Kudal) पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती नोटीस बजावली होती. या विरोधात महाविकास आघाडीनं कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चात भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्याबद्दल प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती.त्यानंतर कुडाळ पोलिसांनी भास्कर जाधवांना अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे. तपास कामात सहकार्य करावं , तसेच नोटीशीतील नमूद अटी-शर्तीचे काटेकोर पालन करावे, करण्यास सांगण्यात आले आहे.

शिवसेनेतील फूटीनंतर आमदार भास्कर जाधव यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. कोकणात पुन्हा शिवसेनेच्या उभारणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कोकणात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राणे पिता पुत्रावर सडकून टीका केली. त्याच दरम्यान जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात जाधव यांनी भाजपावर आणि एकंदरीतच शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. राणे पिता-पुत्रांची नक्कल करत नारायण राणेंचा त्यांनी ‘कोंबडीवाले’ असाही उल्लेख केला होता. नारायण राणेंचं कायम एकच भाषण असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली, ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात का? अशा शब्दांत भास्कर जाधवांनी नारायण राणेंना लक्ष्य केलं होते. त्यामुळे या वक्तव्यांमुळे जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आता भास्कर जाधव यावर काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in