'आम्हाला निमंत्रण का नाही?'

देवेंद्र फडणवीसांचे चिपी विमानतळाच्या बांधकामात महत्त्वाचे योगदान आहे.
'आम्हाला निमंत्रण का नाही?'
Prvin darekar Sarkarnama

मुंबई : सिंधुदुर्गातील (Sindhudurg) चिपी विमानतळाचे (CHIPI airport) उद्घाटन आज (9 ऑक्टोबर) होत आहे. पण या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) या दोघांनाही देण्यात आलेले नाही. मात्र सिंधुदुर्गचे नव्याने केंदीय मंत्री झालेले नारायण राणे (Narayan Rane) यांना मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. या कार्यक्रमाबाबत प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे

Prvin darekar
जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे ; पडळकर कडाडले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं अद्यापही निमंत्रण न दिल्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन आता राजकीय मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.'देवेंद्र फडणवीसांचे चिपी विमानतळाच्या बांधकामात महत्त्वाचे योगदान आहे. मात्र तरीही विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत आमची नावे नाहीत, कार्यक्रम पत्रिकेवर नावे तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, यातून राज्यसरकार सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असल्याचेच सिद्ध होते, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहेत.

तर दूसरीकडे या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक मंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विरोधाच आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नावही छोट्या अक्षरात छापल्याने त्यांनी शुक्रवारी जाहीर सभेत नाराजीही व्यक्त केली. मात्र आज एकाच व्यासपीठावर हे दोन्ही मंत्री उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.