तेव्हा सगळ्यात जवळचे म्हणून आदित्य ठाकरेंना फोन केला पण त्यांनी...

Aditya Thackeray|Yogesh Kadam|Shivsena : दापोली मतदारसंघात माझा पराभव करण्याची योजना होती.
Aditya Thackeray, Yogesh Kadam Latest News
Aditya Thackeray, Yogesh Kadam Latest NewsSarkarnama

Yogesh Kadam : ज्यावेळी माझ्या दापोली मतदारसंघात माझ्यावर अन्याय होत होता त्यावेळी मी मित्र म्हणून आणि जवळचे म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी फोन करून त्यांना सर्व प्रकार सांगितला होता. मात्र, त्यांनी त्यावेळी काहीच भूमिका घेतली नाही. उलट त्यानंतर माझे खच्चीकरण करणारांना प्रोत्साहन दिलं गेल, अशी खंत शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपूत्र आणि शिंदे गटाचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. (Aditya Thackeray, Yogesh Kadam Latest News)

Aditya Thackeray, Yogesh Kadam Latest News
शिवसेना संपवायला निघालेल्या भाजपला सोडले तर पक्षप्रमुखांचे काय चुकले? दानवेंचा सवाल..

योगेश कदम म्हणाले, माझ्या मतदारसंघात मी पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली जात होती. निधी वाटप करत असतांना पालकमंत्री अनिल परबांकडून त्यांना पाच-पाच कोटीचा निधी दिला जात होता आणि माझा पराभव करण्याची योजना होती. माझ्या मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपुजन हे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते होत होते. तर त्या पाटीवर माजी आमदारांचे नाव होते मात्र माझे नावही नव्हते, असा आरोप कदमांनी केला.

याबरोबरच नगरपंचायत निवडणूकीत मला बाजूला केलं गेल. तेव्हा माझ्यावर अन्याय होत असल्याने मी या गोष्टी माझ्या सगळ्यात जवळचे असलेले माजी मंत्री आदित्य ठाकरेंना याबाबत सांगितले. मात्र त्यांनी त्यावेळी काहीच भूमिका घेतली नाही. उलट मला त्यानंतर जास्त त्रास झाला. आणि पुढच्या लोकांना प्रोस्त्साहन दिलं गेलं, असा आरोप आमदार कदमांनी केला आहे.

Aditya Thackeray, Yogesh Kadam Latest News
एकनाथ शिंदेंचा फोन आला होता; खासदार संजय जाधवांचा गौप्यस्फोट...

ज्यावेळी तटकरे माझ्या मतदारसंघात विकासकामाचे भूमीपुजन करत होते. तेव्हा मी विधानसभेत हक्कभंग आणला तेव्हा 'मातोश्री'वरून का हक्कभंग आणला, अशी आपुलकीची हाक आली नसल्याचे कदमांनी सांगितले. माझ्यावर काय अन्याय होत होता याबाबत माजी मंत्री उद्य सांमत यांनी मिडियासमोर सविस्तर सांगितलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मी भाजपमध्ये जाणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांनी माझी बाजू का ऐकली नाही याच दु:ख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिंदे गट आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र यावी याबाबत मी पुढाकार घ्यावा इतका मोठा मी नाही मात्र, अशी भूमिका सर्वच शिवसैनिकांची आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजुची काही मंडळी तोडायची भाषा करत आहेत. यामुळे संबंध बिघडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com