मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

Maharashtra Politics | आघाडीतील इतर पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणतात
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

पालघर : “ त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याकडचे आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाऊ नयेत त्यामुळे ते अशी वक्तव्यं करत आहेत. पण आम्हाला निवडणुकांची भीती नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आ्म्ही काम करत नाही.” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्या मध्यावधी निवडणुकांचं काय लॉजिक आहे? ते हा संभ्रम का निर्माण करत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाची राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले. त्याचबरोबर यासाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर मात्र ठाकरेंच्या या विधानाची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य करत ठाकरेंवर निशामा साधला आहे.

“आघाडीतील इतर पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणतात. त्यात काँग्रेसचे २२ जण भाजपमध्ये जाणार आहेत. तर काहीजण बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. पण आपली माणसं थांबवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

“ पण आमचं १७० आमदारांचं सरकार मजबूत आहे. पुढचे अडीच वर्षे आपण पूर्ण ताकदीनं काम करु आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत, हे त्यांना माहिती असल्याचने ते घाबरले आहेत. या अडीच वर्षानंतरही काम करणाऱ्या लोकांनाच जनता निवडून देणार आहे. तेव्हा आमच्या २०० हून अधिक लोक निवडूण येतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com