
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडानंतर शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, त्यानंतर अनेक वेळा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तर सध्या दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
असे असतानाच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवत भाजप बरोबर जाऊन महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? असा सवाल करत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
''भाजप बरोबर युतीमध्ये असणारे महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे आज काय स्थान आहे? जानकर आणि खोतकर यांचे जे झाले तेच भविष्यात शिंदे गटाचेही होईल'', असा टोला भास्कर जाधवांनी लगावला. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले, ''भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. देशात आणि राज्यात छोटे पक्ष शिल्लक राहू नये, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यामाध्यमातून आपल्याच पक्षाला जनाधार मिळण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे'', असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
''सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे काय झाले? शिंदे गटाचाही असाच वापर होणार आहे, भाजप शिंदे गटाला देखील सोडणार नाही '', असा दावाही त्यांनी केला. ''तसेच दापोलीत येणाऱ्या काळात ठाकरे गटाचा आमदार असेल'', असं भाकीतही त्यांनी यावेळी ववर्तवलं.
दरम्यान, ''भाजपच्या (BJP) या नितीमुळे भाजपमधील जुने नेते देखील त्रस्त आहेत'', असा हल्लाबोल देखील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.