भाजपच्या पोलखोलला शिवसेना कारनामे उघड करत देणार उत्तर

शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून 15 मेपासून गावागावात जाणार
भाजपच्या पोलखोलला शिवसेना कारनामे उघड करत देणार उत्तर
BJP, Shiv Senasarkarnama

देवगड : भाजपचे (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) मुंबईत शिवसेनेच्या (Shivsena) कारभाराची पोलखोल करण्याची भाषा करीत असतील, तर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपचे तालुक्यातील कारनामे गावागावात जाऊन उघड करणार असल्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिला आहे. कोटकामते प्रकरणावरून भाजपचीच पोलखोल झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावाला.

तालुक्याच्या विविध घडामोडींवर भाष्य करताना साळसकर म्हणाले, "कोटकामते सरपंचावर झालेल्या कारवाईतून भाजपचे कारनामे समोर आले आहे. मागील 15 ऑगस्टला सरपंचाच्या स्वच्छ कारभाराचा भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी हवाला देत आमच्यावर टीका केली होती. आता कोटकामते सरपंचावर पोलिस कारवाई झाल्याने महाराष्ट्र दिनी त्यांचा सत्कार करण्याची किंजवडेकर यांनी मागणी करावी.

BJP, Shiv Sena
बच्चू कडू यांना मोठा दिलासा; 9 मे पर्यंत अटक टळली

तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावपातळीवर स्वच्छ कारभार करणार म्हणून सांगत असायचे, ते हेच का, असा सवाल साळसकर यांनी केला. आता तर कोकण (Konkan) आयुक्तांनी कोटकामते सरपंचांना अपात्र ठरवण्याचे आदेशही दिले आहेत. पोलिसांचा या प्रकरणातील तपासही संशयास्पद वाटतो. संशयितांना येथील पोलिसांकडून विशेष सुविधा दिल्याचेही निदर्शनास आले आहे. कोठडीत असलेल्या सरपंचांना पोलिसांनी पंखा उपलब्ध करून दिला होता, असा अरोपही साळसकर यांनी केला आहे.

याची खात्री करण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. मुंबई मनपाच्या कारभाराची पोलखोल करण्याची नितेश राणे भाषा करतात. मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील भाजपचे कारनामे आम्ही शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून 15 मेपासून गावागावात जाऊन उघड करणार आहोत. आमच्या नारिंग्रे सरपंचावर झालेली कारवाईही चुकीची असून, त्याबाबत शिवसेना वरिष्ठ पातळीवर दाद मागेल, असेही साळसकर यांनी सांगितले.

BJP, Shiv Sena
कृष्णप्रकाश हे बदलीवर अद्यापही नाराज, पवारानंतर आता ठाकरेंना भेटणार

भाजप नगरसेवकांचा मुड बदलला?

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत उद्यान प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारणीच्या झालेल्या निर्णयाबाबत नितेश राणे स्थानिक नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांना पत्र देतात, याचे आश्‍चर्य वाटते. भाजप नगरसेवक सभेला उपस्थित असताना ठरावाला विरोध करीत नाहीत, याचा अर्थ नगरसेवक आमदारांना जुमानत नाहीत. यावरून भाजप नगरसेवकांचाच आता मुड बदललेला दिसतो, अशी खोचक टीका साळसकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.