सावंतांना पराभूत करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या विठ्ठल देसाईंना लागणार अध्यक्षपदाची लॉटरी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पूर्वानुभव पाहता धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sindhudurg Bank

Sindhudurg Bank

sarkarnama

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : राज्यात सहकार क्षेत्रात सर्वाधिक ‘हाय व्होल्टेज’ ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा (Sindhudurg District Bank) निकाल जाहीर होवून भाजपने बाजी मारत सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan Rane) यांचा पूर्वानुभव पाहता धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Vitthal Desai and Atul Kalsekar's name in discussion for Chairmanship of Sindhudurg Bank)

जिल्हा सहकारी बँकेसाठी ३० डिसेंबरला मतदान झाले. निवडणुकीसाठी ९८१ मतदार निश्चित झाले होते. त्यातील ९६८ मतदारांनी मतदान केले होते. ३१ डिसेंबरला मतमोजणी झाली. त्यावेळी २२ मतदारांनी उमेदवारांना नाकारत नापसंत मतदान केले. निकालामध्ये अनेक धक्कादायक निर्णय देत भाजपला ११, तर महाविकास आघाडीला ८ संचालक दिले, त्यामुळे जिल्हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. या निकालात महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सतीश सावंत व भाजपचे पॅनेल प्रमुख राजन तेली यांना अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. तब्बल १० विद्यमान संचालक पराभूत झाले, तर १५ नवीन चेहरे निवडून आले आहेत.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg Bank</p></div>
हर्षवर्धन पाटील ब्रीच कँडीत दाखल

भाजपची सत्ता आल्याने गेली साडेसहा वर्षे जिल्हा बँकेत अध्यक्ष असलेले सतीश सावंत यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. आता नवीन कारभारी निवडला जाणार आहे. हा कारभारी कोण असेल? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. भाजपची सत्ता आल्याने साहजिकच नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण? याचा निर्णय केंद्रीय मंत्री राणे घेणार आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या ११ सदस्यांमध्ये अतुल काळसेकर हे दुसऱ्यांदा निवडून आलेले संचालक आहेत. अन्य १० चेहरे नवीन आहेत. त्यामुळे काळसेकर यांच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी पारडे झुकत आहे. पण, राणे यांना निवडीवेळी धक्कातंत्राचा वापर करण्याची सवय आहे. नेहमीच्या स्टाईल प्रमाणे धक्कातंत्राचा वावर केल्यास सतीश सावंत यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या विठ्ठल देसाई यांचीही लॉटरी लागू शकते. मनीष दळवी यांनाही संधी देऊ शकतात.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg Bank</p></div>
दिलीप मोहितेंच्या मंत्रिपदाच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली!

विलास गावडेंचा पराभव करणाऱ्या दळवींचेही नाव चर्चेत!

दरम्यान, न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्याने दळवी मतदानसुद्धा करू शकले नव्हते. तरीही त्यांनी विलास गावडे यांच्यासारख्या सक्षम विद्यमान संचालकाचा पराभव केला. तसेच, ते आमदार नीतेश राणेंच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते. वैयक्तिक या जिल्हास्तर मतदार संघातून निवडून आलेल्या संदीप उर्फ बाबा परब यांचेही नाव पुढे येऊ शकते. परब हे उच्च शिक्षित व तरुण आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com