जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून भाजपच्या दोन गटांत जोरदार हाणामारी

सोमवारी रात्री उशिरा परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून भाजपच्या दोन गटांत जोरदार हाणामारी

bjp

sarkarnama

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या (bjp) दोन गटातील वादाचे पर्यवसान अखेर हाणामारीत झाले. गेली काही महिने दोन गटांत सतत धुमसत असलेला वाद सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank election) पार्श्वभूमीवर अखेर हाणामारीपर्यंत पोचला. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्रवीण नाडकर्णी व रोहीत नाडकर्णी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री उशिरा परस्पर विरोधी तक्रार दाखल झाली आहे. हा प्रकार रविवारी (ता. २ जानेवारी) उशिरा घडला. (Violent clashes between two BJP factions in Sindhudurg District Bank elections)

भाजपच्याच दोन गटांत मारामारी झाल्याने प्रकरण चिघळले होते. बांद्यातून अनेक कार्यकर्तेही येथे आले होते. वातावरण तणावपूर्ण होते. मात्र, संभाव्य धोका ओळखून दंगल नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या रविवारी रात्रीच येथे आल्याने तणाव निवळण्यास मदत झाली.

bjp

पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी पाठवलेली ‘कुमक’ राणेंच्या मदतीला आली अन्‌ भाजपचा विजय झाला!

सावंतवाडी तालुका प्रभारी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांचे पुत्र शैलेश दळवी यांच्यात नाडकर्णी यांनी दळवी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गेले दोन दिवस सुप्त संघर्ष सुरु होता. त्यातूनच रविवारी सायंकाळी त्यांच्यात येथील बाजारपेठेत हाणामारी झाली होती. ते प्रकरण सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी येथील पोलिस ठाण्यात येवून मिटवले होते; मात्र त्यानंतर पुन्हा नाडकर्णी यांचे बंधू आणि पुतणे आणि शैलेश दळवी यांच्या गटातील माजी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली. त्यावेळीही पुन्हा मारामारी झाली. त्याबाबत चव्हाण यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली आहे.

bjp

१०५ वर्षांनंतर निवडणूक लागली आणि भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले!

त्यात म्हटले आहे की, चव्हाण, त्यांचे सहकारी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दीपक गवस तसेच इतर कार्यकर्ते यांच्या सोबत दोडामार्ग बसस्थानकासमोरील त्यांच्या खासगी कार्यालयात होते. अचानक बाहेरून मोठ्या आवाजात त्यांचे नाव घेऊन शिव्या देण्यात येत होत्या. त्यावेळी बाहेर येऊन पाहिले असता हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडा घेऊन कार्यालयाच्या समोर उभे असलेले प्रवीण नाडकर्णी व रोहित नाडकर्णी दिसले. तेव्हा चव्हाण व प्रवीण गवस कार्यालयाच्या बाहेर आले असता प्रवीण नाडकर्णी व रोहित नाडकर्णी या दोघांनीही लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने हल्ला चढवून त्यांना जखमी केले. चेतन चव्हाण यांनी नोंदविलेल्या या फिर्यादीनुसार प्रवीण नाडकर्णी व रोहित नाडकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी दिली.

bjp

शिवसेनेत वाद पेटला : माजी नगराध्यक्षाने सर्वांसमक्ष फाडला अर्ज; शहरप्रमुखाची बंडखोरी!

दरम्यान, प्रवीण नाडकर्णी व रोहीत नाडकर्णी यांनाही त्याच दरम्यान मारहाण झाल्याची व रोहीत नाडकर्णी यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्याबाबत अद्याप येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नसली तरी उशिरा तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.