Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या सभेत लावरे 'तो' व्हिडीओ; उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ अन्...

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिर सभा कोकणातील खेडमध्ये झाली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहिर सभा कोकणातील खेडमध्ये होत आहे. या सभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे जुने व्हिडीओ दाखवण्यात आले. ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका केली होती, ते व्हिडीओ यावेळी दाखवण्यात आले.

शिंदे यांच्या सभेमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यावर काही सभांमध्ये टीका केली होती. त्या सभेतील हे व्हिडीओ होते. या व्हिडीओंची एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडीओ दाखवले होते. त्याच प्रमाणे आजच्या सभेत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे हे व्हिडीओ दाखवले.

Eknath Shinde
CJI D.Y. Chandrachud News : ''सुनावणीदरम्यान नोंदवलेली निरीक्षणं निकालात येतातच असे नाही''

दरम्यान, यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, माध्यमांनी कॅमेरे जरा आमच्यापेक्षा मागे फिरवावेत. लांबपर्यंत नागरिकांची झालेली गर्दी पहायला मिळेल. ही झालेली गर्दीच योगेश कदम यांच्या विजय निश्चित करणार आहे.

पाच तारखेची सभा ही विचार देणारी नव्हती, तर शिवीगाळ करणारी होती. अनेक सत्ता आल्या गेल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी शिंदेंनी आम्हाला गुवाहाटीला नेहून आणले आणि अनेकांच्या पोटात दुखु लागले. कोकणातल्या विविध जिल्ह्यांसाठी आपण भरभरून निधी दिला आहे. रत्नागिरीला ८०० कोटी दिले. मात्र, हात रिकामे असल्याचे ते बोलले.

Eknath Shinde
Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकरांची जहरी टीका; उद्धव ठाकरे हेच गद्दार : त्यांनी शिवसेना संपवली

योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. योगेश कदमांना कमी निधी देऊन राष्ट्रवादीला जास्त निधी दिली जात होता. मागच्या वेळी आपल्यासोबत काय झाले हे मी पाहिले, आपल्याला ७६ लाख दिले राष्ट्रवादीसाठी ६ कोटी दिले गेले. त्याचा मी साक्षीदार आहे, असेही उदय सामंत म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी कुणी नाही म्हणून मला पालकमंत्री केले होते. मी विश्वासाने सांगतो. योगेशला काही कमी पडून देणार नाही. बाळासाहेबाचे विचार पुढे नेहण्याचे काम हे मुख्यमंत्री करत आहेत, असे सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com