Vaibhav Naik News : मोठी बातमी | ठाकरेंचे निष्ठावान वैभव नाईकांचे जिल्हाप्रमुखपद गेले; चर्चांना उधाण !

Vaibhav Naik News : नाईकांनी काय दिले स्पष्टीकरण?
Vaibhav Naik News : Uddhav thackeray
Vaibhav Naik News : Uddhav thackeraySArkarnama

Sindhudurg News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना पदावरून हटवले. नाईकांना हटवल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Vaibhav Naik News : Uddhav thackeray
Devendra Fadanvis: शेतकऱ्यांची नापीक जमीन भाड्याने घेऊन काय करणार? फडणवीसांनी दिलं उत्तर

नव्या नियुक्तिमध्ये संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय रंगली होती. यामुळे त्यांना पदावरून हटवल्याचे बोलेले जाते. मात्र आपल्याकडे पक्षवाढीसाठी जबाबदारी दिल्याने, जिल्हाप्रमुख पद काढून घेतले आहे, असे स्पष्टीकरण नाईक यांनी माध्यमांना दिली आहे.

Vaibhav Naik News : Uddhav thackeray
Rohit Patil : "हिमाचलप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय..." ; रोहित पाटलांचे मोठे विधान!

आता निष्ठावान समजले जाणारे नाईक यांचीच महत्त्वाच्या पदावरून गच्छंती झाल्याने, पक्षांतर्गत टिकेचा सूर उमटू लागल्याचे सूत्रांची माहिती आहे. नाईक यांना पदावरून हटवल्यानंतर, नव्याने ज्यांची नियुक्ती करण्यात आली, ते पूर्वी राणे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे निष्ठावंतांना डावलून पूर्वीच्या राणे समर्थकांना पदे का दिली जात आहेत? असे प्रश्न पक्षांतर्गत उमटू लागल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com