Uddhav Thackeray : उद्धवजी, तुम्ही शंभर वेळा आलात तरी, खेडचा आमदार योगेश कदमच : सभेपूर्वीच कदमांनी डिवचलं!

Ramdas Kadam : "एकनाथ शिंदे आम्हाला खोके देतात विकासासाठी, तुम्ही अडीच वर्षात काय केलं?"
Uddhav Thackeray : Ramdas Kadam : Yogesh Kadam : Kokan News :
Uddhav Thackeray : Ramdas Kadam : Yogesh Kadam : Kokan News : Sarkarnama

Kokan News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (ता. ५ मार्च) खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशानिमित्त सभा होणार आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंची सभा होत आहे. ही सभा ऐतिहासिक व रेकॉर्डब्रेक व्हावी, असा आदेश मातोश्रीवरून देण्यात आला आहे. मात्र ठाकरेंच्या सभेपूर्वीच राजकीय टीका टिपण्णी सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray : Ramdas Kadam : Yogesh Kadam : Kokan News :
Rajan Salvi ACB Inquiry : ठाकरे गटाच्या आमदारांच्या घराचे मोजमाप, साळवींना अश्रू अनावर; एसीबीची कारवाई!

सभेपूर्वी रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कदम म्हणाले, "आज सायंकाळी कोकणातील खेडच्या गोळीबार मैदानात उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा आहे. या सभेला पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिकांना बोलवण्यात आलेलं आहे. कारण त्यांना कल्पना आहे की, खेड हा रामदास कदमांचा बालेकिल्ला आहे. म्हणून ठाकरेंच्या या सभेला स्थानिक जनता येणार नाही. म्हणून या सभेला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून शिवसैनिकांना बोलवण्यात आलं आहे. म्हणजे रामदास कदमांना किती महत्त्व आहे, हेच यातून स्पष्ट होतेय."

"अनिल परबला इथे पालकमंत्री केल्यानंतर योगेश कदमला संपवायचंय आणि संजय कदमला तिकीट देवून पुढे आणायचंय, हा अट्टाहास त्यांचा कायमचा होता.पण उद्धवजी तुम्हाला एक सांगतो. तुम्ही एक वेळा नाही, शंभरवेळा जरी खेडला आलात तरी योगेश कदम पन्नास हजार मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असे कितीही चिनपाट जरी आले, तरी त्याला आम्ही भीक घालत नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Uddhav Thackeray : Ramdas Kadam : Yogesh Kadam : Kokan News :
Thackeray on Konkan Tour : उद्धव ठाकरेंनी कदमांच्या ‘होम ग्राउंड’वरील सभेची जबाबदारी दिली ‘या’ दोन मोठ्या नेत्यांवर!

"मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रचंड खोके विकासासाठी देतायेत. प्रचंड खोके. पन्नास कोटी, शंभर कोटी, दिडशे कोटी, असे कोटीच्या कोटी खोके विकासासाठी देतात. आणि जनतेला विकास पाहिजे. तुम्ही अडीच वर्षात केलं काय?, असा सवाल ही त्यांनी ठाकरेंना विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com