Barsu Refinery News : बारसुत रिफायनरी समर्थक अन् विरोधक आज आमने-सामने ; उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर..

Barsu Refinery Project : नारायण राणे आणि ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे.
Barsu  Refinery Project
Barsu Refinery Project Sarkarnama

Uddhav Thackerays visit barsu refinery project : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन झाले. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे.

काही ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजापूर बारसू येथे येणार आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Barsu  Refinery Project
Karnataka Assembly Elections : अमित शाहांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला ; जयराम रमेश म्हणाले, "‘असत्यमेव जयते..’

राजापूर येथे आज रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं आहे. त्यामुळे नारायण राणे आणि ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे.

रिफायनरीच्या प्रवेशाच्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिगेट्स लावले आहेत. संचारबंदीचा बोर्ड लावला आहे. या जागेवर पोलीस तैनात आहेत. त्यांच्या सुरक्षेअंतर्गत 25 एप्रिलपासून बारसूच्या 5 हजार एकर जमिनीवर माती परीक्षण सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायणराणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. "बारसूत येऊन दाखवाच," असा इशारा नारायण राणेंनी दिलाय.

Barsu  Refinery Project
Sanjay Raut News : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही ; राऊताचं सूचक Tweet ; 'हे पैज लावून..'

प्रस्तावित रिफायनरी जेथे होणार आहे त्या माळरानावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या रिफायनरीमुळे माळरानावरची एका महिलेची शेती गेली. काही दिवसापूर्वी आंदोलन करताना, उन्हामुळे चक्कर आल्यानंतरही तिने रुग्णालयात जाण्यासाठीही नकार दिला. राजापूरमधील महिलेने 'जीव गेला तरी इथेच थांबेन' असा इशारा दिला होता.

याआधीही अनेक प्रकल्प कोकणात झाले आहेत. त्यावेळीही प्रकल्पांआधी माहिती कुणकुण लागून परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आणि कोट्यवधी रुपये सरकारकडून वसूल केले. आताही 224 परप्रांतियांनी बारसूत जमिनी घेतल्याचा दावा होत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com