Thackeray on Konkan Tour : उद्धव ठाकरेंनी कदमांच्या ‘होम ग्राउंड’वरील सभेची जबाबदारी दिली ‘या’ दोन मोठ्या नेत्यांवर!

संजय कदम यांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Uddhav Thackeray Sabha in Khed
Uddhav Thackeray Sabha in KhedSarkarnama

खेड (जि. रत्नागिरी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या (ता. ५ मार्च) खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांच्या प्रवेशानिमित्त सभा होणार आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात गेलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवर ठाकरेंची सभा होत आहे. ही सभा ऐतिहासिक व रेकॉर्डब्रेक व्हावी, असा आदेश मातोश्रीवरून देण्यात आला आहे. माजी मंत्री अनंत गीते व आमदार भास्कर जाधव यांच्याकडे या सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. (Uddhav Thackeray's Sabha in Khed on Sunday)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रविवारी खेड येथे येत असून, हे त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे आणि रस्त्यारस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. याबाबत आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा असल्याने ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray Sabha in Khed
Varun Sardesai On Deshpande Attack : देशपांडे हल्ल्याबाबत वरुण सरदेसाईंचे मोठे विधान : ‘हल्लेखोर आमच्या पक्षाचे असू शकतील. पण...’

माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे खेडमध्ये येत आहेत. रविवारी (ता. ५ मार्च) सायंकाळी ५ वाजता येथील गोळीबार मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ऐतिहासिक व रेकॉर्डब्रेक व्हावी, असा आदेश मातोश्रीवरून देण्यात आला आहे.

शिवसेना नेते माजी मंत्री अनंत गीते व आमदार भास्कर जाधव यांच्याकडे या सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय कदम यांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी कामाला लागले आहेत. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तसेच गुहागर तालुक्यात विभागवार बैठका घेण्यात आल्या आहेत.

Uddhav Thackeray Sabha in Khed
Kokan Politics : मोठी बातमी ! राष्ट्रवादीचा बडा नेता उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांची उपस्थिती

खेडमधील गोळीबार मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी ८० फूट लांब आणि ३० फूट रुंद तसेच ८ फूट उंच असे भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. सव्वा लाख लोक जमतील इतकी मैदानाची क्षमता असून ३५ हजार खुर्च्या लावण्यात येणार आहेत. भारतीय बैठकीवर १५ ते १६ हजार शिवसैनिक बसणार आहेत. व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray Sabha in Khed
Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोदी सरकारचे मोठे पाऊल; 'या' सहा मंत्र्यांची नेमली कमिटी

'निष्ठावान शिवसैनिक पेटून उठलाय'

लोकशाहीचा गळा घोटून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवसेनेचे धनुष्यबाण काढून घेतले. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पेटून उठला आहे. त्यांच्या मनात गद्दारांविषयी प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. तो आपल्या मनातील राग सभेला उपस्थित राहून काढेल. त्यामुळे शिवसेनेची ही सभा ऐतिहासिक होणार आहे, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com