उद्धव ठाकरेंनी लोकांना ब्लॅकमेल करणं बंद करावं...

Ramdas Kadam : आता कोण नेता, कोण उपनेता अशी खिरापत वाटणे सुरू आहे.
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest NewsSarkarnama

Ramdas Kadam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर त्यांच्या गटात आलेल्या आमदार, खासदार आणि नेत्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर सातत्याने टीका केली जात आहे. दरम्यान शिंदे गटाचे उपनेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

आता शिवसेना (Shivsena) भवनचे दरवाजे सताड उघडे असून कोणीही या..कोण नेता, कोण उपनेता अशी खिरापत वाटणे सुरू आहे. मात्र आमदार, खासदार अन् मंत्र्यांना जर आधीच असे भेटले असते, तर ही वेळ शिवसेनेवर आली नसती, फक्त बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती दिवस ब्लॅकमेल करणार आहात,अशी जळजळीत टीका कदमांनी केली आहे. (Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News)

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
'वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा' : भाजप नेत्याचा पवारांना टोला...

कदम म्हणाले, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी फक्त मंत्रालयात फक्त तीनवेळा आले होते. जेव्हा कोकणावर वादळाचे, महापुराचे संकट आले तेव्हा ठाकरे आले नव्हते आणि आता बापबेटे बाहेर पडत आहेत. आता तर शिवसेना भवनाचे दरवाजे सताड उघडले असून कोणीही या, बसा, भेटा, असं सुरू आहे. हेच जर आधीच झालं असतं तर ही वेळ पक्षावर आणि त्यांच्यावर आली नसती, असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

राष्ट्रवादीच्या लोकांना पैसे देऊन अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याची संधी दिली. आपल्या आमदारांचे म्हणणे थोडे जरी ऐकून घेतले असते आणि लक्ष घातले असते तर आज ही अवस्था झाली नसती, अशी टीका कदमांनी केली.

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
दिल्लीत 'आप' सरकार कायम; विश्वासदर्शक ठराव जिंकला...

कदम पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किती वर्षे लोकाना ब्लॅकमेल करणार आहात? बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही सहमत होता का? त्यांचे विचार हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात होते. मग तुम्ही पवारांच्या मांडीवर बसताना तुम्हाला बाळासाहेबांची आठवण का झाली नाही? याचा का विसर पडला? या सर्व प्रश्वाची उत्तरं उद्धव ठाकरेंना द्यावी लागणार आहे. आता त्यांनी भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

तर उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरेंनंतर मी देखील महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी लोकांसमोर वास्तव ठेवणार असून ५२ वर्षे पक्ष उभा करण्यासाठी काम केले असून उद्धव यांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. तसेच आदित्य यांनाही उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणूनच मंत्रीपद मिळालं मात्र पक्ष आम्ही वाढवला आहे, असे दौऱ्यादरम्यान लोकांना सांगणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in