Uddhav Thackeray News : चिंचवडमध्ये ती गद्दारी झाली नसती तर...: उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

Shivsena News : उद्धव ठाकरे यांची कोकणात खेडमध्ये सभा झाली
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Konkan News : कसबा पोटनिवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवला, चिंचवडमध्येही गद्दारी झाली नसती तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय झाला असता, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यादांच चिंचवड पोटनिवडणुकीवर भाष्य केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा आज (ता.५) रत्नागिरीतील खेडमध्ये झाली. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश; हजारोंचा जनसागर अन् संजय कदमांचा, रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले, यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. मेघालयात जाऊन संगमा यांच्यावर टीका केली. संगमा यांच्यावर टीका केली, आता त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली. अमित शाह पुण्यात येवून बोलले होते, की उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले, मग आता तुम्ही संगमांसोबत काय करत आहात, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. तुमच्या परवानगीने शिवसेना स्थापन झालेली नाही. मुंबईत आशीर्वाद यात्रा काढत आहेत, त्यांना तुम्ही आशीर्वाद देणार आहात का? धणुष्यबाण हातत घेताल पण कपाळावर जो गद्दारीचा शिक्का आहे, तो कसा पुसणार? काय चूक केली होती, कोरोनात चांगले काम केले ही चूक होती का? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News : उद्या दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादारांची काय हालत होईल; ठाकरेंचा इशारा

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी चांगला मुद्दा हाताळला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. तेही अस्वस्थ आहेत. देशाचे स्वातंत्र धोक्यात आले आहे, कारण स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काहीच केले नाही, ते गादीवर बसले आहेत. भारत मातेसाठी सुर्वे यांचे सारखे सैनिक लढत असतात. गोमूत्र शिंपडून स्वातंत्र मिळत नाही. भाजपला काय वाटल शिंपडले गोमूत्र आणि झालो स्वातंत्र. अनेक क्रांतीकारक असे आहेत, त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहित नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in