खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी सेनेतून काढून टाकलं ; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोमणा

नारायण राणेंनी (Narayan Rane) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख करीत ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे मी कोकणात आलो. त्यांच्या प्रेरणेने आजही मी काम करीत आहे, असे सांगितले.

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी सेनेतून काढून टाकलं ; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोमणा
Uddhav Thackeray, Narayan Ranesarkarnama

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झाले. यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अनेक कोपरखळ्या मारल्या. या विमानतळावरुन श्रेयवाद रंगल्यामुळे राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात शाब्दीक युद्ध होणार असल्याची चर्चा होती. आपल्या भाषणात राणेंनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या उल्लेख करीत ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे मी कोकणात आलो. त्यांच्या प्रेरणेने आजही मी काम करीत आहे, असे सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''शिवसेना, कोकण याचं नातं आहे. कुणी काय केले, यावर बोलण्याचा आज दिवस नाही. पण आज नाईलाजास्तव बोलावं लागत आहे. कोकणाची निसर्ग संपदा गोव्यापेक्षाही चांगली आहे. यापूवी कोकणचा कर्लिफोनिया करु असे अनेक वेळा म्हटलं गेलं. मग चिपी विमानतळ व्हायला इतका उशीर का झाला, असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

''कोकणाच्या विकासाबाबत तळमळीने बोलणं अन् मळमळीनं बोलणं वेगळं. पाठातंर करुन बोलणं वेगळं असते. ज्योतिरादित्य शिंदे हे तळमळीने बोलत होते. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोकणचा विकास करु या. सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, पण आता कोणी म्हणेलही मी बांधला,'' असा टोमणा ठाकरे यांनी राणेंचं नाव न घेता त्यांन लगावला.

Uddhav Thackeray, Narayan Rane
वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी

''चिपी विमानतळ झाले आता येथे हेलीपोर्ट करा, त्यामुळे पर्यटकांना समुद्राची सफऱ अनुभवता येईल, नारायण राणेंनी विकासाच्या बऱ्याच गोष्टी केल्यात्याबाबत तुम्हाला धन्यवाद. पण येथील जनतेने विनायक राऊत हे निवडणूक आलेले खासदार आहेत, म्हणून मला त्यांचा अभिमान आहे,'' अशा शब्दात ठाकरे यांनी राणेंना टोमणा लगावला.

आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन राणेंनी कोकणाचा आपण कसा विकास केला याबाबत सांगितले. तोच धागा पकडून ठाकरेंनी राणेंवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ''खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं. राणे 'लघू' मंत्री असले तरी मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुम्हाला मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा. विकासात राजकीय जोडे आणू नका.'' ''पेढ्यातील गोडवा, अंगी बाणावा लागतो, दाखवावा लागतो,'' असा खोचक टोला भाषणाच्या शेवटी ठाकरेंनी राणेंना लगावला.

या सोहळ्याला नागरी हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे नवी दिल्लीहून ऑनलाइन सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार रामदास आठवले आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.