Maharashtra Politics : कोकणात विजय मिळविणारे राजन साळवी आणि शिलेदारांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

Maharashtra Politics : लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा दणदणीत विजय
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra Politics : लांजा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी सभासदांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. लांजा खरेदी-विक्री संघावरील विजयाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत राजन साळवी आणि शिलेदारांना ठाकरेंनी शाबासकी दिली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : ''शिंदे सरकार 'या' तारखेला कोसळणार''

लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या दणदणीत विजयानंतर आमदार डॉ. राजन साळवी यांनी सर्व विजयी उमेदवारांसह शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.

लांजा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक शिव सहकार परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेलचा धुव्वा उडवत 17 पैकी 15 जागेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

Uddhav Thackeray
Politics : ठाकरेंनी आदेश दिला तर रत्नागिरीतून सामंतांविरोधातही लढेन : भास्कर जाधवांचे खुले आव्हान

खरेदी-विक्री संघावर ठाकरे सेनेची एकहाती सत्ता आली. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी सर्व विजयी उमेदवारांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

दरम्यान, या वेळी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, जगदीश जुलूम, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भुवड यांच्यासह आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com