ज्याच्यावर वार झालेत त्याने नावे सांगितली आहेत : उदय सामंतांचा राणेंना इशारा

कोकणातील Konkan राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Uday Samant, Narayan Rane

Uday Samant, Narayan Rane

sarkarnama

सिंदुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राणेंनी या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नसले तरी यावरून वाद पेटला आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा थेट संघर्ष आता सुरू झाला आहे. भाजप नेतृत्वाने राणेंना आलेल्या नोटिशीची दखल घेतली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मैदानात उतरले आहेत. त्यांनी नोटीस काढणाऱ्या पोलिसांना अडचणीत आणले आहे. यावरुन शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी टोला लगावला आहे.

<div class="paragraphs"><p>Uday Samant, Narayan Rane</p></div>
मतदानादिवशीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अडचणीत

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे (nitesh rane) यांच्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग येथील घटनेला काय पार्श्वभूमी आहे हे जनतेला माहीत आहे. महाराष्ट्रातील पोलिसांना बदनाम करणे योग्य नाही. सिंधुदुर्गात कायदा सुव्यस्था पळाली जात आहे. जर कोणाला पोलिसांची कारवाई चुकीची वाटत असेल तर त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे.

राज्यात अन्य ठिकाणी जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडल्या पण दबावाचे राजकारण झाले नाही. दादागिरी हा प्रश्न नंतरचा पण ज्या व्यक्तीवर वार झाले त्यांनी नावे सांगितली आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सगळे स्पष्ट होईल, असे सामंत म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Uday Samant, Narayan Rane</p></div>
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही असं ठरवलयं -देवेंद्र फडणवीस

या वेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर होत असलेल्या मालवणी महोत्सवावर भाष्य केले. ते म्हणाले, मालवणी महोत्सवात कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेतली जाईल. LBGT ग्रुपने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध केला आहे. सुधीर भाऊ यांच्याकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे, असेही सामंत म्हणाले. विद्यापीठात सर्वांना समान संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओमिक्रॅान रुग्णाची संख्या दुपटीने वाढत आहे. उच्च तंत्रशिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची मी बैठक घेणार आहे. जो अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असेही सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com