
रत्नागिरी: “मातोश्री हा फार मोठा पल्ला आहे. लोकप्रतिनिधी झाल्यानतंर राजकीय संस्कृती पाळायची असते. पण ज्यांना राजकीय संस्कृतीच नसेल तर त्यांच्यावर बोलणे योग्य नाही आणि त्यांना तितकं महत्वही देऊ नये. मातोश्रीवर येणं फार सोपं वाटत असेल तर त्यांनी आजमून पहावं,” असं आव्हान उदय सामंत (Uday Samant) यांनी राणा दांपत्यांना दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसाचे पठण करावे, अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा (Navneet rana) मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी इशारा दिला होता. यानंतर शिवसेना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी (१७ एप्रिल) दुपारी रवी राणा दांपत्याच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवासस्थानासमोर हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले होते. मात्र अमरावती पोलिसांनी शिवसैनिकांना रोखून धरले.
या मुद्द्यावरुन शिवसेना नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राणा दाम्पत्याला खुले आव्हान दिले आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणे ही फॅशन झाली आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याने त्यांचा टीआरपी वाढतो. माझं तर आव्हान आहे की, मातोश्री तर दूर राहिलं, त्यांनी अमरावतीतील शिवसेनेच्या एखाद्या शाखा प्रमुखाच्या घरासमोर जाऊन आरती करावी, हनुमान चालिसा म्हणावी. त्याची तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखालाही कळवावी. पण शाखा प्रमुख सोडा, गटप्रमुखाचे घरासमोर जावे आणि त्याचे परिणाम पहावेत, असा इशाराही दिला आहे. अशा वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे, याची गृहविभागाने दखल घेतली पाहिजे,” असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेतील, असे वक्तव्य केले हाते. ''राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जागा घेणार यामध्ये काहीही शंका नाही. कारण शिवसेनेने बाळासाहेबांची विचारधारा सोडलेली आहे, आज फक्त राज ठाकरेंमध्येच पण बाळासाहेबांची प्रतिमा पाहायला मिळते. राज ठाकरे बाळासाहेबांच्या शिकवणीला धरुनच प्रत्येक गोष्टीत लढत आहेत,” असंही उदय सामंत यांंनी म्हटले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.